Home सामाजिक संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

12 second read
0
0
15

no images were found

संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

 

मुंबई : अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा छावा चित्रपट सध्या बॉलिवूड विश्वात धुमाकूळ घालत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य आणि बलिदानाची कथा या सिनेमाच्या माध्यमातून 70 मिमी पडद्यावर साकारण्यात आली असून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या सिनेमाला मिळत आहे. सिनेमातील अनेक सीन अंगावर शहारे आणणारे आहेत, तर काही सीन्स पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचंही दिसून येतं. त्यातच, उद्या 19 फ्रेबुवारी रोजी छपत्रती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असून ‘छावा’ चित्रपटामुळे देखील संभाजी महाराजांच्या बलिदानाची कथा अभिमानाने आणि तितक्याच संवेदनेनं समोर येत आहे. मात्र, इंटरनेट विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिवभक्तांनी संताप व्यक्त केला आहे. इतिहास अभ्यासक आणि शिवप्रेमींकडून हा मजकूर हटविण्याची मागणी केली जात आहे. आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.   

.       छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर इंग्रजीत आक्षेपार्ह लिखाण केलेलं आहे. यासंदर्भात, आपण सायबरच्या आयजींना सांगितलं आहे. तसेच, विकिपीडियावर संपर्क करत याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत, त्यांच्यासंदर्भात असले लेखन खपवून घेणार नाही, असेही मुख्यमंत्र्‍यांनी म्हटले. आपल्याला कल्पना आहे की विकिपीडीया हे भारतातून संचालित होत नाही, त्यांचे नियम आहेत. यासंदर्भातील एडिटोरीयल राईट्स कोणाकडे असतात हे पाहिलं जाईल. ऐतिहासिक गोष्टी तोडून मोडून करण्यापेक्षा नियमावली तयार करा, अशा सूचना आपण देऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.  

      माध्यमांची भौगोलिक रचना होती, मात्र आता समाज माध्यमामुळे ती नाही. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असीमित नाही, दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर कोणीही घाला घालू शकत नाही. यासंदर्भात नियमावली तयार करता येईल का? याचा विचार सुरू आहे. दरम्यान, विकिपीडियातील मजकूरसंदर्भात कारवाई केली जाईल, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.  

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…