Home राजकीय येत्या 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत चांगला निकाल येईल :- बाळासाहेब थोरात

येत्या 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत चांगला निकाल येईल :- बाळासाहेब थोरात

2 second read
0
0
103

no images were found

येत्या 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत चांगला निकाल येईल :- बाळासाहेब थोरात

 

मुंबई :- ‘येत्या 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत चांगला निकाल येईल. एकमेकांच्या मदतीने आमचा चांगला निकाल येईल ही वस्तुस्थिती आहे’, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अजित पवारांच्या बंडाची कुणकुण लागली होती, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. ‘काहीतरी शिजत होते, याचा वास आम्हाला येत होता. अजित पवार हे सभेमध्ये फक्त एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करायचे. पण, फडणवीसांना मोकळे सोडायचे, हे जाणवत होते,’ असंही थोरात यांनी म्हटलंय.

अजित पवार यांच्या बंडानंतर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलं आहे. ‘शरद पवार फक्त महाराष्ट्रात हात जोडून जरी फिरले तरी राष्ट्रवादी उभी राहिल आणि ते निवडणूकीच्या निकालात चांगला आकडा आणतील’ असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. त्याच्या या वक्तव्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …