Home मनोरंजन निहारिका रॉयने आपली मेक-अप रूम पिवळ्या रंगात रंगवली

निहारिका रॉयने आपली मेक-अप रूम पिवळ्या रंगात रंगवली

7 second read
0
0
42

no images were found

निहारिका रॉयने आपली मेक-अप रूम पिवळ्या रंगात रंगवली

‘झी टीव्ही’वरील ‘प्यार का पहला नाम राधा मोहन’ या नव्या परिपक्व प्रेमकथेने प्रारंभापासूनच प्रेक्षकांची पसंती मिळविली आहे. तिचे कथानक आजच्या काळातील वृंदावनमध्ये घडते. मन गुंतवून ठेवणारे कथानक आणि मोहन (शब्बीर अहलुवालिया), राधा (निहारिका रॉय) आणि दामिनी (संभाबना मोहन्ती) यासारख्या व्यक्तिरेखांमुळे या मालिकेने प्रेक्षकांना टीव्हीच्या पडद्याला खिळवून ठेवले आहे. अलीकडच्या काही भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की दामिनी आणि कावेरी ह्या गुणगुणला तिच्या बर्थडे पार्टीमधून पळवून नेऊन मारण्याची योजना आखत आहेत. तर दुसऱ्या बाजूला गुरू माँ ह्या सतत तुलसी किर्ती नागपुरे ला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत.

चित्रीकरण सुरू नसते, तेव्हा बहुतांशी कलाकार आपल्या मेक-अप रूममध्ये पुढील प्रसंगाची तयारी करीत असतात किंवा आराम करीत असतात. त्यामुळे मेक-अप रूम हे त्यांचे दुसरे घरच बनते. मेक-अप रूमला दुसरं घर वाटण्यासाठीच अलिकडेच निहारिका रॉयने आपली मेक-अप रूम पिवळ्या रंगाने रंगवून तिची पुनर्रचना केली. या खोलीच्या केवळ भिंतीच नव्हे, तर तिचे टेबल, पलंगावरील चादर, उशीचे अभ्रे, पडदे, कपाटे, सॉफ्ट खेळणी या सार्‍्या गोष्टी पिवळ्या रंगाच्या आहेत. ही मेक-अप रूम तिला आपली घरची खोली वाटावी, यासाठी तिने हे सारे बदल केले असून ते सारे बदल तिने स्वत: केले आहेत.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…