Home स्पोर्ट्स २०३६ ऑलिम्पिक’’ खेळांच्या यजमानपदासाठी भारत सज्ज : अमित शाह

२०३६ ऑलिम्पिक’’ खेळांच्या यजमानपदासाठी भारत सज्ज : अमित शाह

10 second read
0
0
21

no images were found

२०३६ ऑलिम्पिक’’ खेळांच्या यजमानपदासाठी भारत सज्ज : अमित शाह

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी देवभूमी उत्तराखंडमध्ये ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा समारोप समारंभाला संबोधित केले. भारत २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक खेळांचे यजमानपद भूषविण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, असे ते आपल्या संबोधनादरम्यान म्हणाले. आयोजनाच्या दृष्टीने ठोस पावले उचलली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

भारताला जर ऑलिम्पिकचे यजमानपद मिळाले, तर हा देशासाठी ऐतिहासिक क्षण असेल. कारण, प्रथमच भारत ऑलम्पिकसारख्या जागतिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी व्यापक रणनीती आखली जात आहेत. भारत सरकारने अधिकृतपणे २०३६ च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी आपली दावेदारीही सादर केली आहे.

या दावेदाराला अधिक बळकट करण्यासाठी अनेक स्तरांवर योजना आखल्या जात आहेत. अहमदाबादजवळील प्रस्तावित ‘स्मार्ट ऑलिम्पिक सिटी’ हे ऑलिम्पिक आयोजनाचे संभाव्य स्थळ असू शकते. तसेच, देशातील प्रमुख शहरांमध्ये देखील विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याच्या शक्यता तपासल्या जात आहेत.

मागील काही वर्षांत भारताने क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. क्रीडांगणाचे आधुनिकीकरण, नवीन क्रीडा संकुलांचे बांधकाम आणि खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे.

       भारतामध्ये ऑलिम्पिक खेळांचे आयोजन झाल्यास भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होऊ शकतो. पर्यटन, व्यापार, परिवहन आणि आदरातिथ्य क्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, हे आयोजन भारतातील युवा पिढीला खेळांकडे आकर्षित करेल आणि देशातील क्रीडा संस्कृतीला अधिक मजबूत करेल.

       पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचे खेळांसाठी असलेल्या योगदानाचा सन्मान करत खेळाडू त्यांना ‘खेळ मित्र’ या नावाने संबोधतात. या आयोजनाचा उद्देश केवळ खेळाडूंना पाठिंबा देणे नव्हे, तर तरुणांना खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे देखील आहे. सरकार विविध योजनांच्या माध्यमातून खेळाडूंना प्रशिक्षण, संसाधने आणि आर्थिक मदत पुरवत आहे, जेणेकरून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट प्रदर्शन करू शकतील. ऑलम्पिक आयोजनाचा हा निर्धार भारतीय क्रीडा संस्कृतीला अधिक मजबूत करण्यास मदत करेल.

इतक्या मोठ्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे हे फार मोठे आव्हानच आहे. पायाभूत सुविधांचा विकास, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था आणि पर्यावरणाचे संरक्षण या मुद्द्यांवर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. यात कोणतेही अडथळे येऊ नये म्हणून भारत सरकार आणि संबंधित यंत्रणा या सर्व बाबींवर आधीपासूनच काम करत आहेत.भारत २०३६ च्या ऑलिम्पिक खेळांच्या यजमानपदासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि त्यासाठी वेगाने तयारी करत आहे. भारताला ही संधी मिळाली, तर क्रीडा विकासाला चालना मिळण्यासह जागतिक स्तरावर देखील देशाची प्रतिष्ठा उंचावणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्र देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाच दिवस बंद छत्रपती शिव…