
no images were found
डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग, साळोखेनगर येथे
शनिवारी पी.एम. इंटर्नशिप योजनेबाबत मार्गदर्शन
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पंतप्रधान इंटर्नशिप योजने’ बाबत सविस्तर माहिती देण्यासाठी डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, साळोखेनगर येथे 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत मार्गदर्शनपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. योजनेबाबत सविस्तर माहिती, मिळणारे फायदे, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि इंटर्नशिपच्या संधी याबाबत यावेळी मार्गदर्शन केले जाणार आहे.
रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (पुणे) परवेझ नायकवडी आणि मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्सचे पश्चिम विभागीय संचालक संतोष कुमार हे योजनेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या व जिल्हास्तरीय विविध योजनांबाबत जिल्हा कौशल्य विकास समन्वयक रजनी मोटे या माहिती देणार आहेत.
पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत देशातील पाचशे कंपनीमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करण्यात आली असून इंटर्नशिपदरम्यान विद्यार्थ्यांना प्रति महिना पाच हजार विद्यावेतन मिळणार आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकणारे विद्यार्थी, पदवीधारक, स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधून ड्रॉप झालेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.
यामाध्यमातून मोठ्या कंपनीमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कॅम्पस डायरेक्टर डॉ. अभिजीत माने, प्राचार्य डॉ. सुरेश माने, डी वाय पाटील ग्रुपचे कौशल्य विकास समन्वय राजन डांगरे यांनी केले आहे.