Home आरोग्य कोल्हापूरमध्ये भारतभरातील न्युरो सर्जनची राष्ट्रीय एमसीएनएस या परिषदेचे आयोजन 

कोल्हापूरमध्ये भारतभरातील न्युरो सर्जनची राष्ट्रीय एमसीएनएस या परिषदेचे आयोजन 

4 second read
0
0
14

no images were found

कोल्हापूरमध्ये भारतभरातील न्युरो सर्जनची राष्ट्रीय एमसीएनएस या परिषदेचे आयोजन 

 

कोल्हापूर( प्रतिनिधी ):-“परिवर्तनशील प्रतिमान, उदयोन्मुख ट्रेंड आणि अमर्यादित विस्तार…” या उद्देशाश अनुसरून कोल्हापूर येथील न्यूरोसर्जन समितीने राष्ट्रीय स्तरावरील मेंदू विकार शस्त्रक्रिया तज्ञांची परिषद आयोजित केलेली आहे. ही परिषद १४ ते १६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान हॉटेल सयाजी, कोल्हापूर येथे संपन्न होणार असून या परिषदेस महाराष्ट्र, गोवा, उत्तर कर्नाटकसह भारतभरतीलच नव्हे तर परदेशातून सुमारे प्रसिद्ध ३०० न्युरोसर्जन सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात मेंदू शस्त्रक्रिया तज्ञ सहभागी होऊन अशा स्वरुपाची मेंदू विकार शस्त्रक्रिया तज्ञांची ऐतिहासिक परिषद कोल्हापूर येथे प्रथमच होत आहे.या परिषदेत मेंदुविकारासंबंधी विशेष वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोत्तम कार्यक्रम सादर केले जातील. ज्यामध्ये व्याख्याने, परिसंवाद, प्रयोगशाळेतील शवविच्छेदन, व्हिडिओ, आव्हानात्मक केसेस, पोस्टर सादरीकरण आणि माहितीपर मार्गदर्शन यांचा समावेश असलेले वैविध्यपूर्ण कार्यक्रम यांचा समावेश असणार आहे. पन्नासहून अधिक स्टॉल्स येथे उभारण्यात येणार आहेत.या परिषदेत दिनांक १४ फेब्रुवारी रोजी ६ विविध विषयांवर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. मेंदूच्या विविध शास्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे.

तर दिनांक १५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते १ या कालावधीत या परिषदेचे औपचारिक उद्घाटन पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ. एन.वाय जोशी आणि सचिव डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

दिनांक १६ फेब्रुवारी दुपारी २ वाजता या परिषदेचा समारोप होणार आहे.

    मेंदू विकार शस्त्रक्रिया संबंधी अद्यवत तंत्रज्ञान, कामकाजातील अडचणी व त्यावरील उपाय, भविष्यातील आवाहने व वाटचाल आदी विषयांवर जगभरातील प्रसिद्ध मेंदूविकार शस्त्रक्रिया तज्ञ एका व्यासपीठावर येवून याबाबत विचार मंथन करतील. कोल्हापूरचे नाव इतर बाबीप्रमाणे आता न्युरो सर्जरी मध्ये हि जागतिक स्तरावर अधोरेखीत झालेले आहे. या परिषदेमुळे पुन्हा एकदा कोल्हापूर न्युरो सर्जरी विभाग उतुंग भरारी घेईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस महाराष्ट्र राज्य एमसीएनएस (मिड वेस्ट चाप्टर ऑफ न्यूरॉलॉजिकल सर्जन ) संघटनेचे अध्यक्ष डॉ. रोहिदास, खजानिस मन्सूरअली सिताब खान, कार्यशाळेचे अध्यक्ष डॉ. उदय घाटे, न्यूरोसर्जन निलेश बाकळे, न्यूरोसर्जन डॉ. अनिरुद्ध मोहिते उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा…

‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा…   नवीन वर्षा…