Home आरोग्य कोल्हापूर सर्जिकल सोसायटीच्या वतीने शल्य चिकित्सकांच्या मॅसीकॉन या वैद्यकीय परिषदेचे आयोजन

कोल्हापूर सर्जिकल सोसायटीच्या वतीने शल्य चिकित्सकांच्या मॅसीकॉन या वैद्यकीय परिषदेचे आयोजन

9 second read
0
0
31

no images were found

कोल्हापूर सर्जिकल सोसायटीच्या वतीने शल्य चिकित्सकांच्या मॅसीकॉन या वैद्यकीय परिषदेचे आयोजन

कोल्हापूर /प्रतिनिधी: असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत मॅसिकॉन शल्यविशारद परिषद दर वर्षी भरवली जाते. या वर्षी कोल्हापूर सर्जिकल सोसायटीने मॅसिकॉन ही परिषद आयोजित करण्याचा बहुमान मिळवला आहे.
सदर परिषद ही ६ ते ९ फेब्रुवारी दरम्यान हॉटेल सयाजी येथे संपन्न होणार आहे. कोल्हापूर सर्जिकल सोसायटीला आठ वेळा महाराष्ट्र राज्य आणि दोन वेळा देशपातळीवर Best Society म्हणून बहुमान मिळाला आहे.

   दिनांक ६ फेब्रुवारी रोजी निरंतर अभ्यास (CME) सकाळी ९ ते ५ या वेळेत होणार आहे. या दिवशी विविध विषयावरील उदा. थायरॉईड, मधुमेह, मुतखडा व नवनवीन शोध या विषयावर सर्जन बोलणार आहेत. त्यामध्ये डॉ. मिलीद रूके – मधुमेह, थायरॉईड वर डॉ. निता बायर, तसेच विविध विषयावर इतर सर्जन बोलणार आहेत. त्याचे दिवशी १२ वाजता निरंतर अभ्यास (CME) चे उद्घाटन होणार आहे. उ‌द्घाटन महाराष्ट्र राज्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजय पुणपाळे व डॉ. डी. वाय. पाटीलचे कुलगुरू, डीन आणि आर, सी.एस.एम. चे डीन यांच्या उपस्थितीत होणार आहे. दिनांक ७ फेब्रुवारी रोजी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया दाखवून त्यातील नवनवीन पद्धती सांगण्यात येणार आहेत.यासाठी अंतराष्ट्रीय स्थरावरचे डॉ. मायदेव तसेच अंतरंग हॉस्पिटलचे डॉ. विवेकानंद कुलकर्णी इंडोस्कोपीक सर्जरी, दुर्बिणीव्दारे हर्णिया, जठराच्या, पित्ताशयाच्या व स्थुलपणवरच्या शस्त्रक्रिया दाखवण्यात येतील. त्याचबरोवर भगेंद्र, मुळव्याध ह्या शस्त्रक्रिया देखील दाखवण्यात येणार आहेत. यासाठी डॉ. रॉय पाटणकर झेन हॉस्पिटल, मुबई, डॉ. पल्लीवेणू, जेम हॉस्पिटल कोइंबतूर, हैद्राबाद वरून डॉ. इस्माईल, कोल्हापूर कॅन्सर सेंटरवरून डॉ. सुरज पवार हे रॉबोटीक सर्जरीचे प्रात्यक्षिक तसेच कोल्हापूर सर्जिकल सोसायटीचे सदस्य विविध शस्त्रक्रिया दाखवणार आहेत.

   दिनांक ७ फेब्रुवारी रोजी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया दाखवून त्यातील नवनवीन पध्दती सांगण्यात येणार आहेत.या परिषदेचे उ‌द्घाटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. प्रविण सुर्यवंशी यांच्या हस्ते व डॉ. संतोष अब्राहम, डॉ. संजय पाटील कुलपती डॉ. डी. वाय. पाटील तसेच महाराष्ट्र राज्य शल्यचिकित्सक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अजय पुणपाळे, सचिव डॉ. सचिन नाईक यांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती परिषदेचे सचिव डॉ. आनंद कामत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
   दिनांक ८ फेब्रुवारी रोजी विविध विषयावरती चर्चासत्र आयोजित केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने डॉ. प्रविण सुर्यवंशी,डॉ. सिध्देश, मैसूर, डॉ. भवरलाल यादव, जयपूर, डॉ. अभय दळवी यांचे चर्चासत्र त्याच दिवशी होणार असून विविध विषया वरील चर्चासत्रे जसे की अन्ननलिकेचा कॅन्सर या विषयी डॉ. श्रीजेयन, केरळ, डॉ. राजनगरकर नाशीक वरून सहभाग घेणार आहेत. रक्तवाहीणीच्या आजारावर डॉ. कामेरकर, हर्णिया विषयी डॉ. राहूल मंदार मार्गदर्शन करणार आहेत. तसेच स्तानचे कॅन्सर व Accidental Trauma, मुळव्याध, भगेद्र या विषयी मार्गदर्शन करणार आहेत. त्याच दिवशी मानाचे जी.एम. फडतारे डॉ. सतिश धारप व्याख्यान देणार आहेत.दिनांक ९ फेब्रुवारी रोजी विविध विषयावरील व्याख्याने होणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने डॉ. पार्थसारथी, डॉ. रेघे, डॉ. पोरवाल डॉ. पल्लीवेलू हे सहभागी होणार आहेत. तसेच विविध शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहेत.

   दि. ९ फेब्रुवारी दुपारी ११ वाजता दुसरे मानाचे डॉ. घारपूरे व्याख्यान, कोल्हापूरचे कॅन्सर सर्जन डॉ. सुरज पवार देणार आहेत. यानंतर विविध विषयावरील बेस्ट पेपर पी.जी. डॉक्टर्स प्रस्तुत करणार आहेत.सदर परिषदेसाठी परिषदेचे अध्यक्ष डॉ. दिपक पाटील, परिषदेचे सचिव डॉ. आनंद कामत, सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. वैभव मुधाळे,परिषदेचे संयोजक डॉ. प्रताप वरूटे, सह सचिव डॉ. बसवराज कडलगे, डॉ. कौस्तुभ कुलकर्णी, डॉ. सौरभ गांधी, डॉ. मानसिंग अडनाईक, खजानीस डॉ. मधूर जोशी, डॉ. सागर कुरूणकर, डॉ. देवेंद्र होशिंग , डॉ अनिकेत पाटील, सर्व आयोजन समिती सदस्य उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा…

‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा…   नवीन वर्षा…