Home शैक्षणिक अभ्यासासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य – प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे

अभ्यासासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य – प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे

3 second read
0
2
84

no images were found

 

अभ्यासासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य – प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे

‘एनआयटी’ मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 

उचगाव ( प्रतिनिधी ):-श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील एनबीए मानांकित न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या (एनआयटी) विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या हिवाळी २०२४ परीक्षेत भरघोस यश मिळवले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे बोलत होते. ते म्हणाले, विद्यार्थ्यांचे परीक्षेतील नेत्रदीपक यश, शासनाच्या युक्ती पोर्टलवर नोंद होणारे त्यांचे नाविन्यपूर्ण प्रकल्प, स्किल हबचे तंत्रकौशल्य विकास कोर्सेस, भाषा विकास, विभागीय व राज्य स्तरावरील खेळातील प्राविण्य याद्वारे एनआयटी हे अतिउत्कृष्ट शैक्षणिक केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असून अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याचे धोरण आहे. एनआयटीच्या तब्बल ५१ विद्यार्थ्यांनी ९०% व त्यावर गुण मिळवले. साधना जाधव (कम्प्युटर) ९६.००% गुण मिळवून अव्वल ठरली. तर सिधांत साळोखे (कम्प्युटर) ९५.४७%, मोनिका सावंत (एआयएमएल) ९५.४४%, हर्ष देसाई (एआयएमएल) ९५.३३%, प्रणव रामाणे (कम्प्युटर) ९५.२६% व सुहानी देसाई (इलेक्ट्रीकल) ९५.१०% यांनी भरघोस गुण मिळवले. तर सिद्धेश चौगले, प्राची शिंदे, महेक मुजावर व सुहानी देसाई यांनी विविध विषयांत १०० पैकी १०० गुण प्राप्त केले. पारदर्शकतेसाठी बोर्डाच्या या परिक्षा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात घेतल्या जातात. एनआयटीमध्ये आता डिप्लोमासह डिग्री इंजिनिअरिंग कोर्सेस उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डाॅ. नितीन पाटील यांनी दिली. यावेळी विभागप्रमुख, स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.संस्थेचे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील, व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार यांनी उत्कृष्ट निकालाबद्दल समाधान व्यक्त करून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…