
no images were found
सुभश्री देबनाथला मिळाले तिचे पहिले ‘ओजी’ सिंगल गाणे
झी टीव्हीवरील ‘सा रे ग म प’ या आयकॉनिक सिंगिंग रिअॅलिटी शो ने आपल्या कला, भावना आणि मनोरंजनाच्या अचूक मिलाफाचा प्रेक्षकांचे लक्ष वेधून ठेवण्यात सातत्य राखले आहे. आता हा शो त्याच्या थरारक फिनालेपर्यंत पोहचला पासून सचिन-जिगर, सचेत-परंपरा आणि गुरु रंधावा या नावाजलेल्या मेंटॉर्सच्या मार्गदर्शनाखाली कसलेल्या कलाकारांमध्ये रुपांतर झालेल्या स्पर्धकांचे अव्वल परफॉर्मन्सेस प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. या वीकेंडचा एपिसोड हासुद्धा एका संगीत पर्वणीपेक्षा कमी असणार नाहीये कारण पाहायला मिळतील सर्वोच्च 6 स्पर्धकांचे असाधारण परफॉर्मन्सेस.
यासगळ्यात उजवा ठरला स्पर्धक सुभश्री देवनाथचे पहिले वहिले ओरिजनल गाणे ‘लव तेरे नाल’ चा लाँच. प्रेम आणि भावनांची सुंदर मेडली असलेल्या या भावस्पर्शी गाण्याला गुरु रंधावा यांनी शब्दबद्ध आणि लयबद्ध केले आहे. त्यांनी या सीजनच्या सुरुवातीलाच झी म्यूझिक कंपनीसोबत सुभश्रीला ही संधी प्रदान केली. जेव्हा गाण्याचे अनावरण ‘सा रे ग म प’ वर चित्रीकरणादरम्यान करण्यात आले तेव्हा मेंटॉर्स आणि प्रेक्षक सुभश्रीचे अप्रतिम प्रदर्शन पाहून थक्क झाले. तिने या गाण्याचा गाभा अगदी अचूकपणे साधला. ‘लव तेरे नाल’ हे तिचे गीत निश्चितपणे पुष्कळ बझ निर्माण करेल आणि संगीत उद्योगातील भावी नवीन कलाकार म्हणून तिच्या प्रवासासाठी मंच तयार करेल.
गुरु रंधावा म्हणाला, “सुभश्री माझ्या टीमचे प्रतिनिधित्व करत आहे आणि दिलेल्या वचनानुसार ‘सा रे ग म प’ च्या माध्यमातून प्रत्येक टीममधील एका कलाकाराला अगदी ब्रांड नवीन गाणे गाण्याची संधी प्रदान करण्याचा आमचा उद्देश आहे. मी अतिशय उत्साहात आहे कारण आमच्या टीममधील सुभश्रीला ही संधी मिळाली. तिला तिची नवीन आणि विशेष ओळख प्रदान करण्याचे यामागील ध्येय आहे. हा शो संपला तरी सर्व स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर तिचे हे गाणे उपलब्ध रहावे असे आम्हाला वाटते ज्यामुळे केवळ ‘सा रे ग म प’साठीच नव्हे तर तिच्या या गाण्यासाठीही ती श्रोत्यांच्या लक्षात राहिल. हे गाणे मी माझा भाऊ आदित्य देवसोबत अरेंजमेंट करून स्वतः लिहिले आणि स्वरबद्ध केले असून एवढ्या कमी काळात त्याने हे सगळे जुळवून आणले यासाठी मी त्याचा अतिशय आभारी आहे. आम्ही अतिशय सुंदर गाणे बनवले आहे आणि मी खरोखरीच आशा करतो की ते सर्वांना आवडेल.”