
no images were found
-
स्कोडा कायलॅकने भारत एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये मिळवले ५ स्टार रेटिंग
कोल्हापूर , : स्कोडा ऑटो इंडियाची पहिली सब-४ मीटर एसयूव्ही कायलॅकला भारत एनसीएपी (न्यू कार अॅसेसमेंट प्रोग्राम)मध्ये प्रतिष्ठित ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. यासह कायलॅक भारत एनसीएपी टेस्टिंगमध्ये सहभाग घेणारी पहिली स्कोडा वेईकल ठरली आहे, जेथे कुशक व स्लाव्हियाने स्थापित केलेला सुरक्षितता सर्वोत्तमतेचा ब्रँडचा वारसा कायम ठेवला आहे. दोन्ही स्कोडा ऑटो इंडियाच्या २.० कार्सनी प्रौढ व्यक्ती व लहान मुलांच्या संरक्षणासाठी त्यांच्या संबंधित ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्ट्समध्ये ५-स्टार सुरक्षितता रेटिंग्ज संपादित केले आहे.
स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पीटर जनेबा म्हणाले, ”स्कोडाच्या डीएनएमध्ये सुरक्षिततेला अधिक प्राधान्य दिले जाते आणि २००८ पासून प्रत्येक स्कोडा कार जागतिक स्तरावर क्रॅश-टेस्टेड करण्यात आली असून भारतात ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. स्कोडा ऑटो ५-स्टार सेफ्टी-रेटेड कार्सच्या ताफ्यासह भारतातील कार सुरक्षिततेवरील कॅम्पेनचे नेतृत्व करत आली आहे. आम्ही ग्लोबल एनसीएपी टेस्ट्स अंतर्गत प्रौढ व्यक्ती व लहान मुलांसाठी संपूर्ण ५-स्टार रेटिंग मिळवणारा पहिला ब्रँड होतो. आणि आता आमची नवीन सब-४-मीटर एसयूव्ही कायलॅक भारत एनसीएपी टेस्टिंगमध्ये तिच्या सेगमेंटमधील अव्वल वेईकल ठरली आहे. या कारमध्ये सर्वसमावेशक सुरक्षितता सिस्टम्स आहेत, ज्यामध्ये सहा एअरबॅग्जसह प्रमाणित म्हणून अॅक्टिव्ह व पॅसिव्ह सुरक्षितता वैशिष्ट्यांची व्यापक श्रेणी आहे. वापरण्यात आलेल्या हॉट-स्टॅम्प स्टील्स पुनर्रचित क्रॅश मॅनेजमेंट सिस्टम कायलॅकमध्ये सर्वोत्तम सुरक्षिततेची खात्री देते. या रेटिंगमधून भारतातील रस्त्यांवर युरोपियन तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते, ज्यामध्ये पाया समाविष्ट आहे, ज्यावर कार निर्माण करण्यात येईल, जी सुरक्षित असेल.”
स्कोडा कायलॅकमधून प्रवाशांच्या सुरक्षिततेप्रती ब्रँडची कटिबद्धता दिसून येते. या कारच्या सर्व व्हेरिएण्ट्समध्ये प्रमाणित म्हणून २५ हून अधिक अॅक्टिव्ह व पॅसिव्ह सुरक्षितता तंत्रज्ञान आहेत. प्रबळ एमक्यूबी-एओ-इन प्लॅटफॉर्मवर निर्माण करण्यात आलेल्या कायलॅकमध्ये प्रगत इंजीनिअरिंग आणि नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत, जी भारतातील रस्ते व ड्रायव्हिंग स्थितींनुसार डिझाइन करण्यात आली आहेत. बेस व्हेरिएण्टपासून प्रमाणित म्हणून समाविष्ट करण्यात आलेली वैशिष्ट्ये सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, रोल ओव्हर प्रोटेक्शन, हिल होल्ड कंट्रोल, मल्टी-कोलिजन ब्रेकिंग आणि एक्सडीएस+ सह कायलॅकने सुरक्षिततेसाठी मापदंड स्थापित केला आहे. हॉट-स्टॅम्प स्टील रचना आणि रिडिझाइन करण्यात आलेली क्रॅश मॅनेजमेंट सिस्टम केबिनमधील सुरक्षितता व अपघातामध्ये स्थिरतेत अधिक वाढ करते, ज्यामुळे ब्रँडचा सुरक्षितता-केंद्रित दृष्टीकोन अधिक दृढ होतो.
भारतातील पुणे येथील टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये नवीन स्कोडा कायलॅकसाठी अभियांत्रिकी विकास, टेस्टिंग व प्रोजेक्ट स्टीअरिंग करण्यात आले, जेथे सर्व पैलूंमध्ये दर्जात्मक कार्यक्षमता संपादित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
ऑक्टोबर २०२२ मध्ये, स्कोडा कुशकने ग्लोबल एनसीएपीच्या नवीन व अधिक कठोर क्रॅश टेस्ट प्रोटोकॉल्स अंतर्गत ५-स्टार रेटिंग संपादित करणारी भारतातील पहिली कार उत्पादक कंपनी बनत सुरक्षितता मापदंडांना नव्या उंचीवर नेले. विशेषत: हा टप्पा महत्त्वाचा होता, जेथे कुशक अडल्ट व चाइल्ड ऑक्यूपण्ट प्रोटेक्शनसाठी ५-स्टार रेटिंग मिळवणारी पहिली वेईकल देखील ठरली होती, ज्यामुळे स्कोडा ऑटो ऑटोमोटिव्ह सुरक्षिततेमधील लीडर बनली आहे.
हा वारसा सुरू ठेवत स्कोडा स्लाव्हियाने एप्रिल २०२३ मध्ये ५-स्टार ग्लोबल एनसीएपी सुरक्षितता रेटिंग संपादित केले, ज्यामळे भारत व झेक रिपब्लिकमधील टीम्सनी विशेषत: भारतासाठी विकसित केलेला एमक्यूबी-एओ-इन प्लॅटफॉर्म अधिक दृढ झाला. कायलॅक आता हा वारसा पुढे घेऊन जात आहे, ज्यामधून विशेषत: भारतातील बाजारपेठेसाठी डिझाइन करण्यात आलेले जागतिक दर्जाचे सुरक्षितता मापदंड वितरित करण्याप्रती स्कोडाची समर्पितता दिसून येते.