
no images were found
23 कनेक्शन खंडीत करुन रुपये 9 लाख 14 हजार 504 इतकी थकीत रक्कम वसुल
कोल्हापूर (प्रतिनिधी):- कोल्हापूर महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागार्फत शहर तसेच ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार, अनधिकृत नळ कनेक्शनधारकांवर नळ कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये सदरबाजार, भंडारे गल्ली, गुरव माळ, ताराबाई पार्ग, कारंडे मळा, शाहु कॉलेज पिछाडीस, गुरव मळा, गंगावेश, पापाची तिकटी, दत्त गल्ली इत्यादी भागामध्ये कारवाई करुन थकबाकीदारांवर कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी 23 कनेक्शन खंडीत करुन रक्कम रुपये 9 लाख 14 हजार 504 इतकी थकीत रक्कम वसुल करण्यात आली आहे.
सदरची कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे व जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता राजेंद्र हुजरे, मयुरी पटवेगार, प्रिया पाटील, अनुराधा वांडरे, महानंदा सुर्यवंशी, पथक प्रमुख अजित मोहिते, मधु कदम, अमर बागल, नरेंद्र प्रभावळकर, संजय पाटील यांनी केली.
तरी हि मोहिम येथून पुढेही सुरु राहणार असून शहरातील सर्व नागरिकांनी आपली अनधिकृत नळ कनेक्शन रितसर अर्ज करुन व योग्य ते शुल्क भरुन नियमित करुन पाणी बिलाची रक्कम वेळेवर भरणा करावी व नळ कनेक्शन बंद करणे, वर्तमानपत्रात नाव प्रसिध्द करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखे कटू प्रसंग टाळावेत असे आवाहन महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.