
no images were found
शिवाजी विद्यापीठामध्ये BBA-MBA इंटिग्रेटेड प्रवेशासाठी संधी’
कोल्हापूर( प्रतिनिधी):- बारावी उत्तीर्ण विध्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठा मध्ये शैक्षणिक सत्र २०२४-२५ पासून नवीन पाचवर्षीय BBA-MBA इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. AICTE मान्यताप्राप्त हा अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार करण्यात आला असून विद्यार्थ्यांना BBA पदवी आणि MBA पदव्युत्तर पदवी मिळविण्याची अनोखी संधी उपलब्ध होणार आहे. BBA-MBA इंटिग्रेटेड अभ्यासक्रमासाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी (कमीतकमी गुण – खुल्या प्रवर्गासाठी ४५% व राखीव प्रवर्गासाठी ४०%) पात्र आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र्र राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया कक्ष (State CET Cell) यांच्यामार्फत घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
विशेष म्हणजे, या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना MBA साठी वेगळ्या प्रवेश परीक्षेला बसण्याची आवश्यकता नाही. BBA-MBA इंटिग्रेटेड हा अभ्यासक्रम आंतरशाखीय दृष्टिकोनावर आधारित असल्याने तो भविष्यातील व्यवस्थापन आव्हानांना अधिक सक्षमपणे तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करतो. विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या अत्याधुनिक सुविधा आणि तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनातून प्रगत शिक्षणाचा लाभ होणार आहे आणि विद्यार्थ्यांना स्वतःला घडविण्यास व समृद्ध करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध होत आहे. हा पाच वर्षांचा एकात्मिक पदवी आणि पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रम विध्यार्थ्यांना भविष्य घडवण्यासाठी एक उत्तम संधी प्रदान करतो.
अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये आणि फायदे:
उज्ज्वल भविष्य: व्यवस्थापनाच्या पदांसाठी अधिक संधी.
स्वतंत्र BBA आणि MBA करण्यापेक्षा किफायतशीर.
प्रगत व्यवस्थापन कौशल्ये: मुलभूत ते प्रगत पातळीवर शिकण्याची संधी.
उच्च प्लेसमेंट दर: आकर्षक पगाराच्या नोकऱ्यांसाठी अधिक संधी.
शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्तीसाठी पात्र विध्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ.
स्पेशलायझेशन निवडीची संधी: ह्यूमन रिसोर्सेस (HR), मार्केटिंग, फायनान्स, प्रोडक्शन, व्यवसाय