
no images were found
श्री अरविंद देशपांडे यांचे ‘लेखक व विद्यार्थी वाचन संवाद’ उपक्रमांतर्गत विद्यापीठात व्याख्यान
कोल्हापूर ( प्रतिनिधी):-वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत ग्रंथालय व माहितीशास्र अधिविभाग , शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्यामार्फत मंगळवार दि. ७ जानेवारी २०२५ रोजी ‘लेखक व विद्यार्थी वाचन संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी मा.श्री. अरविंद देशपांडे, माजी समन्वयक विस्तार सेवा केंद्र, सांगली तथा ‘सृजनाची स्वप्नं जागवताना’ या पुस्तकाचे लेखक यांची प्रकट मुलाखत अधिविभाग प्रमुख डॉ.एस. बी .पाटील यांनी घेतली. मुलाखती दरम्यान श्री. देशपांडे यांनी समन्वयक, शिक्षक व नरेंद्र विद्यापीठाचे संस्थापक संचालक म्हणून राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती श्रोत्यांना दिली. त्याबरोबरच वाचनीय पुस्तके, ग्रंथपालांची उपक्रमशीलता, ग्रंथालयांचे महत्व, समाजउपयोगी उपक्रम इ. बाबत उपस्थित विद्यार्थी व श्रोत्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अधिविभागप्रमुख डॉ.एस .बी. पाटील यांनी केले. त्याबरोबर प्रमुख वक्त्यांना परिचय डॉ. वाय. जी. जाधव, सहयोगी प्राध्यापक यांनी करून दिला. सदर कार्यक्रम प्रसंगी डॉ. डी. बी. सुतार, संचालक, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केद्न , शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर यांनी ‘ग्रंथपरीक्षण कसे करावे’ याबाबत विद्यार्थांना मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. कार्यक्रमास ज्ञान स्रोत केंद्राचे उपग्रंथपाल डॉ. पी.बी. बिलावर, वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक डॉ. धनंजय गुरव, डॉ. आर . डी. खामकर आदी उपस्थित होते . कार्यक्रमाचे आभार सहाय्यक प्राध्यापक श्री . विनोद गुरव यांनी मानले. सदर कार्यक्रमास अधिविभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी ,विद्यार्थी, संशोधक व ज्ञान स्रोत केंद्रातील सहकारी उपस्थित होते.