
no images were found
कलाकारांनी विश्व हिंदी दिवस निमित्ताने सांगितले त्यांचे आवडते ‘हिंदी’ शब्द!
विश्व हिंदी दिवस निमित्त एण्ड टीव्ही कलाकार भारताच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या हिंदी भाषेचे जतन व संवर्धन करण्याचे महत्त्व सांगण्यासोबत त्यांचे आवडते हिंदी शब्द आणि त्या शब्दांशी संलग्न असण्यामागील कारणे सांगत आहेत. हे कलाकार आहेत रवी महाशब्दे (मालिका ‘अटल’मधील क्रिष्णन बिहारी वाजपेयी), स्मिता साबळे (मालिका ‘भीमा’मधील धनिया), हिमानी शिवपुरी (मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील कटोरी अम्मा) आणि रोहिताश्व गौड (मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील मनमोहन तिवारी). मालिका ‘अटल’मध्ये क्रिष्णन बिहारी वाजपेयीची भूमिका साकारणारे रवी महाशब्दे म्हणाले, ”अभिनेता व लेखक असल्यामुळे मला दृढ विश्वास आहे की, हिंदी प्रमाणे इतर कोणतीही भाषा भावना वास्तविकपणे कॅप्चर करू शकत नाही. मला हिंदी दैनंदिन जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग असलेला देश व संस्कृतीचा भाग असण्याचा अभिमान वाटतो. हिंदी माझी आवडती भाषा आहे आणि आवडते एक किंवा दोन शब्द निवडणे खूप अवघड आहे. पण, एका शब्दाची निवड करायची झाली तर तो शब्द असेल ‘आत्मनिर्भर’, म्हणजेच स्वावलंबी. या शब्दामधून ताकद व स्वातंत्र्य दिसून येते, जे आपण व्यक्ती म्हणून देशासाठी प्रयत्न केले पाहिजे.” मालिका ‘भीमा’मध्ये धनियाची भूमिका साकारणाऱ्या स्मिता साबळे म्हणाल्या, ”हिंदी भाषा भारताचा इतिहास व संस्कृतीमध्ये खोलवर रूजलेली आहे. माझा आवडता हिंदी शब्द आहे ‘अभ्युदय’ म्हणजे समृद्धता. सुरूवातीला, या शब्दाचा उच्चार करणे आणि दैनंदिन संवादांमध्ये समावेश करणे अवघड गेले. तरीही हा शब्द माझा आवडता बनला, जेथे मी माझ्या मुलाला विकास व प्रगतीचे महत्त्व सांगताना हा शब्द वापरण्यास सुरूवात केली. लहान असो मोठे, त्याने काहीतरी यश संपादित केल्यानंतर मी म्हणायचे ‘यह तुम्हारे अभ्युदय की शुरूवात है’ (ही तुझ्या प्रगतीची सुरूवात आहे).”
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये कटोरी अम्माची भूमिका साकारणाऱ्या हिमानी शिवपुरी म्हणाल्या, ”आपल्या संस्कृतीशी संलग्न राहणे महत्त्वाचे आहे आणि आपली मातृभाषा आपल्याला परिभाषित करते. कॉलेज दिवसपासून माझा आवडा हिंदी शब्द आहे ‘नि:सर्ग सौंदर्य’, म्हणजे निसर्गाचे सौंदर्य. हा शब्द लांबलचक व उच्चार करण्यास गुंतागूंतीचा असल्याने सुरूवातीला खूप अवघड वाटायचा, पण माझ्या कवितांमध्ये हा शब्द वापरण्यास सुरूवात केल्यापासून मी या शब्दाच्या प्रेमात पडले, तसेच मला त्याचा अर्थ समजला. हा शब्द आपल्याला निसर्गाची अद्वितीय भव्यता आणि त्याचे जतन करण्याच्या महत्त्वाची आठवण करून देतो.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्ये मनमोहन तिवारीची भूमिका साकारणारे रोहिताश्व गौड म्हणाले, ”आपण हिंदी भाषेचे सौंदर्य ओळखले पाहिजे. ही भाषा आपल्याला आपल्या संस्कृतीशी कनेक्ट करते. या भाषेमध्ये सखोलता सामावलेली आहे आणि कवी म्हणून माझे नेहमी या भाषेच्या सृमद्धतेने लक्ष वेधून घेतले आहे. माझा आवडता शब्द आहे ‘आविष्कार’, म्हणजेच नवोन्मेष्कार किंवा शोध. मला हा शब्द आवडतो, कारण हा शब्द सर्जनशीलता, प्रगती आणि ज्ञानाच्या अविरत शोधाचे प्रतीक आहे. प्रत्येकी वेळी मी ‘आविष्कार’ शब्दाचा वापर करतो तेव्हा मला विचारशक्तीची आणि ते आपल्या विश्वाला कशाप्रकारे आकार देतात याची आठवण होते. हा शब्द आशेला पुढे घेऊन जातो आणि आपल्याला मर्यादांपलीकडे विचार करण्यास प्रेरित करतो, ज्यामधून आपल्या संस्कृतीचा नाविन्यपूर्ण उत्साह दिसून येतो. माझ्यासाठी, या शब्दामधून भाषिक आकर्षकतेसोबत हिंदी भाषेने आपल्यामध्ये जागृत केलेल्या विकास व शोधाचे महत्त्व देखील दिसून येते.”