
no images were found
हंगामाकडून क्रिप्टोकरन्सी आणि गुन्हेगारीचे काळे रहस्य उलगडणारी पिरॅमिड ही नवी थ्रिलर वेब सिरीज सादर
कोल्हापूर, : भारतातील आघाडीचे डिजिटल मनोरंजन मंच असलेले हंगामा ओटीटी क्रिप्टोकरन्सी आणि गुन्हेगारीच्या गूढ जगात प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी पिरॅमिड ही आपली नवीन ओरिजिनल मालिका सादर करत आहे. विशेषत्वाने हंगामा ओटीटीवरून स्ट्रीम होणारी ही वेब सिरीज रहस्य, रोमांच आणि थरारक कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची हमी देते.
हेली शाह, रोहन मेहरा, हर्षद अरोरा, करण शर्मा आणि क्रिसन बरेटो या प्रतिभावान कलाकारांच्या सहभागाने सजलेली ही वेब सिरीज अर्जुन बॅनर्जी यांच्या खळबळजनक हत्येचा तपास उलगडते. अर्जुन हा पिरॅमिड नावाच्या नाविन्यपूर्ण क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्मचा निर्माता आहे. त्याच्या अचानक मृत्यूमुळे लाखो लोकांचे खाते ब्लॉक झाले असून उत्तरांच्या शोधात देश अस्वस्थ झालेला आहे.
पत्रकार वृंदा (हेली शाह) या घटनेतील सत्य शोधण्यासाठी तपास करत असते. या तपास प्रवासात तिला फसवणुकीच्या जाळ्यातील छुपे हेतू, विश्वासघात आणि अनेक रहस्यांचा सामना करावा लागतो. तिचा सत्यशोध तिला एका धोकादायक मार्गावर नेत असतो, जिथे प्रत्येक वळणावर धोका असतो आणि प्रत्येक गोष्ट तितकी सोपी नसते जितकी ती दिसते.
हंगामा डिजिटल मीडियाचे व्यवस्थापकीय संचालक नीरज रॉय म्हणाले की, क्रिप्टोकरन्सी जागतिक अर्थव्यवस्थेला नवा आकार देत असताना, ही मालिका त्याच्या गडद बाजूंवर प्रकाश टाकते आणि प्रेक्षकांना एक रोमांचक अनुभव देते. सणासुदीच्या काळात पिरॅमिड ही वेब सिरीज सादर करताना आम्हाला आनंद होत असून या माध्यमातून प्रेक्षक एक आकर्षक कथा अनुभवू शकतील.
पिरॅमिडचे दिग्दर्शक नितीश सिंग म्हणाले की, ही वेब सिरीज एका वेगाने बदलणाऱ्या डिजिटल जगाच्या पार्श्वभूमीवर मानवी लालसा, विश्वासघात आणि जिद्दीच्या संकल्पनांचे बारकाईने परीक्षण करते. प्रत्येक पात्र हे बहुपेडी असून ते आपल्या भूमिकेने कथानकाला समृद्ध करते आणि प्रेक्षकांना या गुंतागुंतीच्या व थरारक जगातील अनेक पदर उलगडण्यास प्रवृत्त करते. मला विश्वास आहे की प्रेक्षक या आकर्षक प्रवासाचा आनंद घेतील.
हंगामा ओटीटी आपल्या मासिक सबस्क्रिप्शनवर २५ टक्के सूट देत असून यामुळे प्रेक्षकांना प्रीमियम कंटेंट कमी किंमतीत पाहता व अनुभवता येईल. पिरॅमिड ही वेब सिरीज हंगामा आणि टाटा प्ले बिंगे, वाचो, बीएसएनएल, प्लेबॉक्स टिव्ही, रेलवायर ब्रॉडबँड, अलायांस ब्रॉडबँड, मेघबेला ब्रॉडबँड, एसीटी फायबरनेट, एअरटेल एक्सट्रिम प्ले आणि डोर टिव्ही या सहभागी मंचावरून विशेषत्वाने स्ट्रीम होत आहे.