
no images were found
तेनाली रामा’ परतत आहे सोनी सबवर,
सोनी सबवरील प्रसिद्ध मालिका ‘तेनाली रामा’ 16 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता दणक्यात पुनरागमन करत यह. नव्या गोष्टी आणि तेनालीच्या पुढे असलेली नवीन आव्हाने सादर करणारी ही मालिका तेनालीचे बुद्धीचातुर्य, त्याची विनोदबुद्धी यांचे दर्शन घडवणारी वेधक कथानके घेऊन येत आहे. कृष्ण भारद्वाज पुन्हा एकदा तेनाली रामाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर पंकज बेरी सुद्धा पुन्हा तथाचार्य ही भूमिका साकारणार आहे. यावेळी मालिकेत कृष्णदेवराय राजाच्या भूमिकेत आदित्य रेडीज आणि गिरगिट राज या खलनायकाच्या भूमिकेत सुमित कौल हे नवीन कलाकार दिसणार आहेत.
विजयनगर सम्राज्यातून बहिष्कृत केलेला तेनाली आता या सम्राज्यावर एक मोठे संकट आलेले असताना पुन्हा या साम्राज्यात परतणार आहे. विजयनगरचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी तेनाली आपल्या बुद्धीचातुर्याचा, विनोदबुद्धीचा आणि धोरणात्मक हुशारीचा उपयोग करताना दिसेल आणि त्याच वेळी चार तरुणांना तयार करताना दिसेल. या मुलांना तो जीवनातील मूल्यांचे धडे देईल. नवनवीन कलाटण्या आणि नवीन व्यक्तिरेखा यांनी नटलेली ही मालिका तेनाली रामाच्या कालातीत वारशाचे दर्शन घडवेल.
टिप्पण्या:
अजय भाळवणकर, बिझनेस हेड, सोनी सब:
“तेनाली रामा सोनी सबवर घेऊन येताना आम्हाला आनंद होत आहे. या मालिकेने पूर्वी टेलिव्हिजनवर आपला ठसा उमटवला होता आणि सगळ्या वयोगटातल्या प्रेक्षकांचे आणि कुटुंबांचे मनोरंजन केले होते. तेनाली एक महान ऐतिहासिक व्यक्तिरेखा आहे. या कथांमधून तेनालीचे सुजाणपण आणि विनोदबुद्धी दाखवून आजच्या परिस्थितीतही त्याची हुशारी किती संबद्ध आहे, ते सांगणार आहोत. आम्हाला खात्री आहे की, तेनाली सगळ्या पिढ्यांमधल्या प्रेक्षकांना आपलासा वाटेल.”
अभिमन्यु सिंह, संस्थापक कॉन्टीलो एन्टरटेन्मेंट आणि तेनाली रामाचे निर्माता:“तेनाली रामा हा लवचिकता, वाक्पटूत्व आणि सहानुभूतीचे प्रतीक आहे. तो खराखुरा लोकनायक आहे. समाजाच्या विविध वर्गांमधील लोकांशी मिळून मिसळून राहण्याचे कसब त्याच्या अंगी आहे. त्याच्यातील सहानुभूती, विनम्रता आणि न्यायबुद्धीमुळे तो बऱ्याचदा तळागाळातल्या लोकांच्या बाजूने उभा राहिलेला दिसतो. यावेळी आकर्षक कथांमधून प्रेक्षकांना तेनाली रामाचा परिचय आम्ही करून देणार आहोत.”
तेनाली रामाची भूमिका करत असलेला कृष्ण भारद्वाज:
“तेनाली रामा साकारणे हे माझे अहोभाग्य आणि माझी जबाबदारी देखील आहे. तेनालीचे बुद्धीचातुर्य आणि त्याच्या मनातील करुणा यामधून आपण आजही खूप काही शिकू शकतो. एक अभिनेता म्हणून त्याची भूमिका करताना या अत्यंत विशाल आणि तरी मानवी व्यक्तिरेखेतील बारकावे शोधण्याची आणि सादर करण्याची संधी मला मिळाली आहे. या भव्य पुनरागामनासोबत तेनालीसमोर नवी आव्हाने उभी असणार आहेत. तेनालीची हुशारी 16वे शतक आणि आधुनिक काळातील दरी कशी भरून काढते हे प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी मी उत्सुक आहे. हा एक विनोद, हृद्य आणि मौलिक जीवन पाठांनी भरलेला प्रवास असणार आहे.”