
no images were found
रविवारी महानगरपालिकेचा वर्धापन दिन
कोल्हापूर (प्रतिनिधी) :- कोल्हापूर महानगरपालिकेचा रविवार, दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी 52 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. यादिवशी सकाळी 9.00 वाजता महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकामध्ये प्रशासक कार्तिकेयन एस यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येणार आहे. ध्वजारोहनानंतर सकाळी 09.10 वाजता माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शपथ घेण्यात येणार आहे. यानंतर सकाळी 09.15 वाजता देशाच्या रक्षणाकरीता धारातीर्थ पडलेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपिता व वीरपत्नी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने शुक्रवार दि.13 ते रविवार दि.15 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत ताराबाई पार्क, सासणे ग्राऊंड येथे खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात केले आहे. तसेच सोमवार, दिनांक 16 ते शुक्रवार दि.20 डिसेंबर 2024 रोजी महापालिकेच्या भास्करराव जाधव वाचनालयातर्फे देवलक्लब, खासबाग येथील गोविंदराव टेंबे रंगमंदीर येथे राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.