
no images were found
इसुझू मोटर्स इंडियातर्फे महाराष्ट्रात सेवा विस्तारीकरण
·
सातारा: इसुझू मोटर्स लिमिटेड, जपान यांची उपकंपनी असलेल्या इसुझू मोटर्स इंडिया या कंपनीने आपली सेवा महाराष्ट्रातही सुरू केली आहे आणि आज साताऱ्यातील नव्या इसुझू ऑथोराइझ्ड सर्व्हिससेंटरचे उद्घाटन करण्यात आले.आपली सेवा व ग्राहक अनुभव यांची व्याप्ती विस्तारण्यावर लक्ष केंद्रीत करून इसुझू मोटर्स इंडियातर्फे साताऱ्यातील भारती मोटर्स यांची महाराष्ट्रातील 7वे ऑथोराइझ्ड सर्व्हिस पार्टनर म्हणून नियुक्ती केली आहे. साताऱ्यातील राष्ट्रीय महामार्गावरील वाढे येथे मोक्याच्या ठिकाणी ही सुविधा आहे. या भागातील इसुझूच्या ग्राहकांना सुरळीत सहाय्य उपलब्ध व्हावे यासाठी या ठिकाणी आधुनिक टूल्स, जेन्यूइन पार्ट्स, ल्युब्स आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध आहे. इसुझू मोटर्स इंडिया आणि भारती मोटर्समधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या उपस्थितीत एएससी सुविधेचे उद्घाटन केले.
या वेळी इसुझू मोटर्स इंडियाचे व्यवस्थापकीय उपपसंचालक श्री. तोतू किशिमोटो म्हणाले, “आमच्या ग्राहकांना सुरळीत व विश्वासार्ह ओनरशिप अनुभव देण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. साताऱ्यातील नव्या ऑथोराइझ्ड सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन ही आमचे सर्व्हिस नेटवर्क बळकट करण्याच्या व आमच्या ग्राहकांच्या जवळ असण्याच्या आमच्या मिशनच्या दिशेने टाकलेले अजून एक पाऊल आहे. भारती मोटर्ससोबत भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद आहे. कारण भारती मोटर्सचे कौशल्य आणि ग्राहककेंद्री दृष्टीकोन आमच्या मूल्यांशी सुसंगत आहे.
भारती मोटर्सचे व्यवस्थापकीय भागीदार मनोज राजेंद्र साळेकर म्हणाले, “इसुझू मोटर्स इंडियाचे साताऱ्यातील ऑथोराइझ्ड सर्व्हिस सेंटर म्हणून भागीदारी केल्याचा आम्हाला अभिमान आहे. भारती मोटर्समध्ये असामान्य सेवा उपलब्ध करून देणे आणि ग्राहकांच्या समाधानाची खात्री करणे यावर आम्ही नेहमी भर देतो. आधुनिक टूल्स व जेन्यूइन इसुझू पार्ट्स या फॅसिलिटीमध्ये असून या भागातील इसुझूच्या ग्राहकांना सर्वोत्तम सपोर्ट देण्यास आम्ही सज्ज आहोत. सर्व इसुझू वाहन मालकांसाठी कायमस्वरुपी नाते निर्माण करण्यासाठी आणि वाहन मालकीचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी आम्ही अत्यंत उत्सुक आहोत.
भारती मोटर्स हा विश्वासार्ह ऑटोमोटिव्ह सर्व्हिस प्रोव्हायडर असून 603/604, वाढे, सांजवारा हॉटेल, राष्ट्रीय महामार्ग, सातारा – 415011 हा त्यांचा पत्ता आहे. दर्जा व ग्राहक समाधानावर त्यांच्या भर असतो. भारती मोटर्समध्ये आधुनिक टूल्स, जेन्यूइन पार्ट्स आणि विश्वासार्ह वाहन देखभाल व दुरुस्ती सेवा देण्यासाठी कुशल टीम आहे. इसुझू मोटर्स इंडियाचे ऑथोराइझ्ड सर्व्हिस सेंटर असलेले भारती मोटर्स, या भागातील इसुझू वाहन मालकांना सुरळीत ओनरशिप अनुभव मिळावा यासाठी कायम प्रयत्नशील असतात.