
no images were found
सुनील तटकरे, धनंजय मुंडेंसह १२ नेते भाजप प्रवेश करणार… !
लोकसभा निवडणुका जशजशा जवळ येतील तशा राज्याच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहे. अशातच काँग्रेस नेते, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या एका ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुनील तटकरे, धनंजय मुंडेंसह अजित दादा गटाचे १२ नेते भाजपात प्रवेश करणार असल्याचा दावा काँग्रेसचे नेते अतुल लोंंढे यांनी केला आहे. एक्स माध्यमावर ट्वीट करत अतुल लोंढे यांनी हा सर्वात मोठा दावा केला आहे.
“धोके पे धोका….ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपाने ठगा नही! सुनिल तटकरे, धनंजय मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्री आदिती तटकरे, सुनिल शेळके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे १२ बडे नेते, मंत्री आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार, असे अतुल लोंढे यांनी त्यांच्या एक्स माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाणार! अजित दादा बहुतेक एकटेच त्यांच्या पक्षात राहणार,” असेही त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे. सध्या त्यांच्या या ट्वीटने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.