
no images were found
मुंबई येथे 129 वी डाक अदालत
कोल्हापूर, : मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबई व्दारे 129 वी डाक अदालत दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी मुख्य पोस्टमास्तर जनरल यांच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर डाकघर विभागाच्या प्रवर अधीक्षकांनी दिली आहे.
महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल वस्तु, मनी ऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव व हुद्दा इत्यादी.
संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सचिव, सहायक निदेशक डाकसेवा (ग्राहक संतुष्टी गुणवत्त आश्वासन एमं निरीक्षण) डाक अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, मुंबई ॲनेक्स बिल्डिंग, 5 वा मजला, मुंबई 400001 यांच्या नावे दोन प्रतीसह दिनांक 10 डिसेंबरपर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. प्रपत्र महाराष्ट्र टपाल सर्कलच्या www.maharashtrapost.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.