Home सामाजिक एचडीएफसी बँकेने भारतातील निम-शहरी आणि ग्रामीण भागासाठी प्रगती बचत खाते सुरू केले

एचडीएफसी बँकेने भारतातील निम-शहरी आणि ग्रामीण भागासाठी प्रगती बचत खाते सुरू केले

14 second read
0
0
25

no images were found

एचडीएफसी बँकेने भारतातील निम-शहरी आणि ग्रामीण भागासाठी प्रगती बचत खाते सुरू केले

 

भारतातील अग्रगण्य खासगी क्षेत्रातील बँक, एचडीएफसी बँकेने “प्रगती बचत खाते” सुरू करण्याची घोषणा केली आहे, जे विशेषतः संपूर्ण भारतातील ग्रामीण आणि निम-शहरी भागातील  लोकांच्या बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे.

एचडीएफसी बँकेच्या 51% शाखा निम-शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये असून बँक ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदत करण्यात आणि वित्तीय समावेशनाला चालना देण्यासाठी सतत कार्यरत आहे. एचडीएफसी बँकाचे प्रगती बचत खाते भारताच्या कृषी क्षेत्रासाठी एक व्यापक बँकिंग परिसंस्था निर्माण करण्याचा उद्देश ठेवते, ज्यामध्ये पारंपारिक शेती आणि पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसायात करणारे शेतकरी, स्वयंरोजगार व्यक्ती, ग्रामीण रहिवासी, स्व-सहाय्य गट आणि सहकारी संस्था यांचा समावेश आहे.

एचडीएफसी बँकेच्या निम-शहरी आणि ग्रामीण भागातील 4600 हून अधिक शाखा या सेवेचा लाभ भारतातील जवळपास दोन तृतीयांश लोकसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी संपर्क केंद्र म्हणून काम करतील, ज्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना मिळेल. याव्यतिरिक्त, नवीन उपक्रमामध्ये अनेक उद्योग-प्रथम वैशिष्ट्ये समाविष्ट असतील, जसे की बिगहाटसोबत भागीदारी, ज्यामुळे 17 दशलक्षाहून अधिक शेतकऱ्यांना कृषी साधनांसाठी सवलत आणि संसाधनांमध्ये प्रवेश मिळेल, ज्यामुळे त्यांची उत्पादनक्षमता सुधारेल.

याशिवाय, बँक सवलतीच्या मालमत्ता ऑफरसह विविध योजना घेऊन आली आहे, ज्यामध्ये टू-व्हीलर लोन (टीडब्ल्यूएल), ट्रॅक्टर लोन (टीआरएल), गोल्ड लोन, किसान गोल्ड कार्ड (केजीसी) उत्पादने आणि एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या भागीदारीत पशु विमा समाविष्ट आहे. याशिवाय, पात्र ग्राहकांना बँकेच्या अनोख्या ‘विशेष’ या ऑफरचा लाभ मिळेल, जी SURU विभागातल्या एचएनआय ग्राहकांसाठी तयार केलेली ऑफर असून, वेगवेगळ्या गरजा असलेल्या वाढत्या शेतकरी वर्गासाठी उपयुक्त आहे.

एचडीएफसी बँकेचे प्रगती बचत खाते शेतकरी समुदायासाठी आर्थिक सेवांमधील अंतर भरून काढण्यासाठी तयार केले आहे, ज्यात बचत खाते, क्रेडिट सपोर्ट, डिजिटल बँकिंग टूल्स, विमा आणि सरकारी सबसिडींमध्ये प्रवेश यासारख्या सानुकूलित उपायांचा समावेश आहे. ग्रामीण डिजिटायझेशनला प्रोत्साहन देण्यावर बँकेचा भर असल्याने, हा उपक्रम शेतकऱ्यांना आणि ग्रामीण रहिवाशांना शेती तंत्रज्ञान, दर्जेदार उत्पादन आणि वित्तीय संसाधने उपलब्ध करून देऊन सक्षम बनवतो, ज्यामुळे ग्रामीण भागांमध्ये आर्थिक समावेशन आणि शाश्वत विकासाला चालना मिळते.

प्रगती बचत खात्याची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • विशेष सवलती: एचडीएफसी बँकेची बिगहाटसोबत भागीदारी, त्यांच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे शेतकऱ्यांना शेतीची साधने, बियाणे आणि खतांवर विशेष सवलत देते, ज्यामुळे शेतकऱ्यांना स्पर्धात्मक किंमती आणि चांगल्या दर्जाची उत्पादने मिळवता येते.
  • अनुरूप ऑफर: प्रगती बचत खाते कमी देखभाल आवश्यकता आणि ग्रामीण आणि निम-शहरी ग्राहकांसाठी विशेष फायदे असलेली सानुकूल वैशिष्ट्ये ऑफर करते.
  • डिजिटल प्रवेश: या ऑफरद्वारे एचडीएफसी बँक आर्थिक साक्षरतेला चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवते आणि ग्रामीण रहिवाशांना बँकिंग आणि आर्थिक व्यवस्थापन सुलभ करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करून सक्षम बनवते.

श्री. पराग राव, कंट्री हेड – पेमेंट्स, लायबिलिटी प्रोडक्ट्स, कंझ्युमर फायनान्स आणि मार्केटिंग म्हणाले, “एचडीएफसी बँक आर्थिक समावेशन आणि कृषी सक्षमीकरणासाठी प्रतिबद्ध आहे. आमच्या प्रगती बचत खात्याद्वारे, आम्ही अनेक उद्योग-प्रथम उपक्रम सुरू करत आहोत, जसे की बिगहाटसोबतची भागीदारी, ज्याद्वारे शेतकऱ्यांना आणि ग्रामीण समुदायांना साधने आणि संसाधने पुरवली जातील, जेणेकरून त्यांना त्यांची उत्पादनक्षमता वाढवता येईल, कर्ज मिळवता येईल आणि चांगले आर्थिक परिणाम प्राप्त होतील. आम्ही ग्रामीण विकासाला पाठिंबा देणारी आणि स्थानिक समुदायांना सक्षम करणारी सर्वसमावेशक आणि शाश्वत व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत.”

 

Load More Related Articles

Check Also

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम कोल्हापूर/ प्रतिनिधी:-…