no images were found
मोदीजींच्या ‘सहकारातून समृद्धी‘ संकल्पनेमुळे समृद्धीचा मार्ग झाला प्रशस्त: अमित शहा
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय सहकारी परिषद-2024 चे उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले, की ‘सहकारातून समृद्धी’ संकल्पनेमुळे मोदीजींनी लाखो गावे, कोट्यवधी महिला आणि शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने समृद्धीचा मार्ग प्रशस्त झाला आहे .
मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि अमित शहा यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली स्थापन सहकार मंत्रालय हे सहकाराच्या क्षेत्राच्या सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी विविध योजनांवर काम करत आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांत देशात केवळ सहकार चळवळीलाच गती मिळालेली नाही, तर तळागाळापर्यंत तिचा आवाका वाढवण्याचे प्रयत्नही झाले आहेत. मोदीजींचे नेतृत्व आणि अमित शहा यांच्या दूरदृष्टीमळे सहकार चळवळ अधिक उर्जेने नियोजनपणे पुढे नेण्यावर प्रयत्न केले जात आहे.
कृषी- दुग्ध- मत्स्यव्यवसाय, विणकाम, पतपुरवठा आणि व्यापारासारख्या विविध उपक्रमांमध्ये ‘ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा’ असलेले सहकार क्षेत्र स्वातंत्र्यानंतरही वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिले. जेव्हा की देशाची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या या क्षेत्रांवर अवलंबून होती. सहकाराचे क्षेत्र श्रम, ग्रामीण अर्थपुरवठ्या सारख्या कोणत्या ना कोणत्या प्रकारे परस्पर सहकार्याशी जोडले गेलेले आहे. अशा परिस्थितीत सहकार क्षेत्राला नव्या क्षितिजाची गवसणी घालण्यासाठी मोदी सरकारने जुलै 2021 मध्ये सहकार मंत्रालयाची स्थापना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. ज्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपवण्यात आली. मोदीजींनी स्वायत्त सहकार मंत्रालयाची स्थापना करून ‘सहकारातून समृद्धी’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे काम केले. लोक कल्याणाशी संबंधित धोरणांमुळे भारतीय राजकारणातील चाणक्य अशी ख्याती असलेल्या अमित यांनी त्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली सहकाराचा पाया आणखी मजबूत केला. शहा यांनी या दिशेने अभूतपूर्व कामे केली आहेत. देशभरातील राज्यांमध्ये सहकारी संस्थांची झालेली निर्मिती आणि त्यांची भक्कम पायाभरणी याचे ज्वलंत उदाहरण आहेत.
गेल्या काही वर्षांत 2 लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्थेची (PACS) स्थापना झाल्यानंतर, आज भारतातील एकही गाव असे राहिलेले जिथे सहकारी संस्थांचा उदय झालेला नाही. या पतसंस्थांना आधुनिक आणि तांत्रिक बनवण्यासोबतच आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे कामही जोमाने केले जात आहे. राष्ट्रीय स्तरावर स्थापन तीन नवीन सहकारी संस्था – नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड (NCEL), नॅशनल को-ऑपरेटिव्ह ऑरगॅनिक्स लिमिटेड (NCOL) आणि इंडियन सीड को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडमुळे (BBSSL) भारतातील शेतकऱ्यांनी केवळ देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवला आहे. सहकाराच्या जगातील कक्षा रुंदावल्या गेल्याने हे शक्य झाले आहे. इफको, कृभको आणि अमूल यांनी सहकार क्षेत्रात संपूर्ण जगात एक आदर्श निर्माण केला आहे. त्याचप्रमाणे या तिन्ही सहकारी संस्था जगभरातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत आहेत. मोदीजींची दूरदृष्टी आणि शहांच्या धोरणांनी प्रेरित होऊन, सहकार मंत्रालयाने आत्मसात केलेला ‘सहकारातून समृद्धी’ हा मंत्र प्रत्यक्षात खरा उतरला आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सहकाराचा दर्जा उंचावून ग्रामीण लोकसंख्येच्या जीवन उर्जा निर्माण झाली आहे.
गेली अनेक वर्षे दुर्लक्षित सहकारी संस्थांना नवा आयाम देण्याचे काम पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा या जोडीने सिद्ध करून दाखविले आहे. त्यामुळे निर्धारातून समृद्धी आणि सिद्धी’चा हा प्रवास अतुलनीय यशांनी परिपूर्ण झाला आहे, असे म्हटले तरी यात वावगे ठरणार आहे.