no images were found
रस्त्यांची कामे दर्जेदार होत नसल्याने ठेकेदार, कन्स्ल्टंटना दंडात्मक कारवाईच्या नोटीसा
कोल्हापूर : सुवर्ण जयंती नगरोत्थान (राज्यस्तर) मधून करण्यात येत असलेल्या रस्त्यांची कामे दर्जेदार होत नसल्याने प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज ठेकेदार मे.एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड डेव्हलपर्स यांना दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे. मागील आठवडयात दि.18 नोव्हेंबर 2024 रोजी प्रशासकांनी सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेमधून सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. यावेळी शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, ठेकेदार मे.एव्हरेस्ट इनफ्रासस्ट्रक्चर ॲन्ड डेव्हलपर्स प्रतिनिधी, प्रकल्प सल्लागार संदीप गुरव ॲन्ड असोसिएट्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी प्रशासकांना ठेकेदार मे.एव्हरेस्ट इनफ्रासस्ट्रक्चर ॲन्ड डेव्हलपर्स यांनी निविदेतील शर्ती व अटीनुसार आवश्यक बाबींची जसे साईट लॅब सुरु करणे, साईट ऑफिस सुरु करणे व इतर बाबींची पुर्तता केली नाही. बारचाट दिला नाही, डांबरीकरण करताना सेन्सर पेव्हरचा वापर केला नाही. त्यामुळे प्रशासकांनी पाहणी करताना कामाच्या जागेवर पंचनामा करुन त्या ठिकाणचे सॅम्पल घेऊन ते मटेरियलचे सॅम्पल गर्व्हन्मेंट पॉलटेक्नीकल कॉलेजला टेस्टींगला पाठविण्याचे आदेश दिले. या टेस्टिंग मध्ये गुणवत्तेपेक्षा कमी प्रमाणात डांबराची क्वांटीटी आढळून आल्याने त्यांना निविदेतील अटी व शर्तीच्या अधिनराहून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
त्याचबरोबर सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेवरील प्रकल्प सल्लागार संदीप गुरव ॲन्ड असोसिएट्स यांनी दसरा चौक ते नंगीवली चौक या रस्त्याच्या कामावर ठकेदारामार्फत मटेरियल टेस्टींगसाठी साईट लॅब, साईट ऑफिस व कामाची गुणवत्ता वेळोवेळी तपासणी करणे इत्यादी बाबींची तपासणी व पुर्तता केली नाही. साईटवर काम करताना सेन्सर पेव्हर नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणली नाही. तसेच गेले 11 महिन्याच्या कालावधीमध्ये 60 टक्के काम पुर्ण करुन घेतले नसल्याने व बारचाट तयार केला नसल्याने या सल्लागार कंपनीला या कामावरुन कमी का करण्यात येऊ नये याबाबत नोटीस बजावली आहे.
शहर अभियंता व कनिष्ठ अभियंत्यांनाही कारणे दाखवा नोटीस देऊन दंडात्मक कारवाई
सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानातील कामाची 16 रत्यांचे कामे विहिती मुदतीत, गुणवत्तापुर्वक व दर्जेदार करुन घेणे, कामावर देखरेख ठेवणेची जबाबदारी शहर अभियंता यांची आहे. मटेरियल टेस्टींगसाठी साईट लॅब असणे, साईट ऑफिस करणे व या कामाचा बारचाट तयार करुन घेणे, कामाच्या जागेवर मटेरियलची तपासणी करण्याची जबाबदारी होती. यासाठी सल्लागार कंपनी व ठेकेदारांशी समन्वय ठेऊन सर्व बाबीची पुर्तता करुन घेणे गरजेचे होते. ही कामे झाली नसल्याने शहर अभियता नेत्रदिप सरनोबत यांना रु.5000/- व तत्कालीन शहर अभियंता तथा जल अभियंता हर्षजीत घाटगे यांना रु.4000/- ची दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच कनिष्ठ अभियंता निवास पोवार हे दसरा चौक ते नंगिवली चौक या रस्त्यावर प्रशासक फिरती करताना साईटवर उपस्थित नसल्याने त्यांनाही रु.3500/- इतका दंड केला आहे.