no images were found
एचडीएफसी बँक परिवर्तन २०२५ पर्यंत ३५०० शाळांमध्ये स्मार्ट क्लासेस स्थापित करणार
एचडीएफसी बँक या भारतातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्र बँकेने आपला सीएसआर उपक्रम ‘परिवर्तन’च्या माध्यमातून भारतभरातील तरूण विचारवंतांना दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून सुसज्ज व सक्षम करण्याप्रती कटिबद्धतेला दृढ करत बालदिन साजरा केला.
गेल्या १० वर्षांपासून परिवर्तनने २.१६ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे, २०.२२ लाखांहून अधिक शिक्षकांना प्रशिक्षित केले आहे आणि २.८७ लाखांहून अधिक शाळांना पाठिंबा दिला आहे. बँकेने डिजिटल मोहिम #LittleSmilesBigDreams लाँच केली आहे, जी एचडीएफसी बँक परिवर्तनचे पाठबळ असलेल्या शाळांमधील गुणवंत तरूण विद्यार्थ्यांना दाखवते.
अशीच एक प्रेरणादायी गाथा जामापूर, वाराणसी जिल्ह्यामधून आहे, जेथे रांची, झारखंडमध्ये आदिवासी जमातीमधील रोजंदारी मजूरांची मुले कलश व कोमल यांनी नवीन अपग्रेडेड स्मार्ट स्कूलमध्ये शिक्षण घेण्यासाठी पावसाळ्यामध्ये स्थलांतर न करण्याचा निर्णय घेतला. एकेकाळी लाजाळू व संकोच करणारा कलश आता इयत्ता पाचवीमधील उत्कृष्ट कामगिरी करणारा विद्यार्थी आहे. एचडीएफसी बँक परिवर्तन आणि अंबुजा सिमेंट फाऊंडेशन यांच्या सहयोगाच्या माध्यमातून शाळेमध्ये आता डिजिटल क्लासरूम्स, आधुनिक ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, क्रीडा सुविधा आणि वॉटर कूलर्स आहेत. शाळेतील सुधारित वातावरणामुळे वंचित समुदायांमधील विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती वाढली आहे आणि पहिल्यांदाच, १४८ विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे.
२०२५ कडे वाटचाल करत एचडीएफसी बँक परिवर्तनने स्पष्ट उद्दीष्टे स्थापित केली आहेत, जी पुढीलप्रमाणे:
१) हस्तक्षेप केलेल्या शाळांमधील २० लाख विद्यार्थ्यांना क्लास-अप्रोप्रिएट शिक्षण मिळण्याची खात्री घेणे
२) डिजिटल शिक्षण व तंत्रज्ञानाचा अवलंब करत ३,५०० शाळांमध्ये स्मार्ट क्लासेस स्थापित करणे
३) २५,००० वंचित विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी स्कॉलरशिप्स देणे, तसेच सतत शिक्षण मिळत उज्ज्वल भविष्य घडवण्याची खात्री घेणे
”एचडीएफसी बँकेमध्ये आमचा विश्वास आहे की, शिक्षण समुदायांसाठी उज्ज्वल व अधिक समान भविष्य घडवण्याचा आधारस्तंभ आहे. परिवर्तन अंतर्गत आमच्या सीएसआर उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही आमचे योगदान देत शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये बदल घडवून आणण्यास मदत करत आहोत, व्यक्तींना सक्षम करत आहोत आणि स्थिर समुदाय घडवत आहोत. आम्ही भविष्य घडवण्यामध्ये गुंतवणूक केली आहे, जेथे प्रत्येक मूल मोठे स्वप्न पाहू शकते आणि त्यांच्या संपूर्ण क्षमतांना ओळखू शकते. यंदा बालदिनानिमित्त, आम्ही तरूण विचारवंतांना सक्षम करण्याप्रती, शिक्षकांना प्रेरित करण्यासाठी कौशल्यांसह सुसज्ज करण्याप्रती आणि अधिक सर्वसमावेशक व उज्ज्वल भविष्यासाठी पायाभूत सुविधांची खात्री घेण्याप्रती कटिबद्धता अधिक दृढ केली आहे,” असे एचडीएफसी बँकेचे उप-व्यवस्थापकीय संचालक कैझाद एम भरूचा म्हणाले.
”मुले आपल्या देशाचे भविष्य आहेत आणि आम्ही त्यांना प्रगती करण्यासाठी आवश्यक असलेली साधने प्रदान करण्याप्रती कटिबद्ध आहोत. हा विश्वास आम्हाला सरकारी संस्था, एनजीओ व सामुदायिक संस्थांसोबत सक्रियपणे सहयोग करण्यास सक्षम करतो, ज्यामुळे शैक्षणिक संसाधने व पाठिंबा गरजूंपर्यंत पोहोचण्याची खात्री मिळते. सहयोगाने काम करत आम्ही परस्पर क्षमतांचा अवलंब करतो, ज्यामुळे सरकारी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढतो, विद्यार्थी अध्ययनाला चालना व पाठिंबा देणारे वातावरण निर्माण होते आणि सर्वांसाठी उज्ज्वल भविष्याचा मार्ग सुकर होतो,” असे एचडीएफसी बँकेच्या सीएसआर प्रमुख नुसरत पठाण म्हणाल्या.
एचडीएफसी बँक परिवर्तनचे शैक्षणिक उपक्रम देशभरात शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी सरकारच्या सर्व शिक्षण अभियानाशी धोरणात्मकरित्या संलग्न आहेत. या उपक्रमांमध्ये शिक्षक प्रशिक्षण, स्कॉलरशिप्स, करिअर मार्गदर्शन व पायाभूत सुविधा पाठिंबा यांचा समावेश आहे, ज्यामुळे वंचित मुलांसाठी रिमीडिल क्लासेस, अध्ययन शिबिरे व विशिष्ट स्कॉलरशिप्सच्या माध्यमातून नाविन्यतेला चालना मिळत आहे आणि शिक्षणाचा दर्जा सुधारत आहे. परिवर्तनने विविध राज्यांमध्ये स्मार्ट क्लासरूम्स लाँच केले आहेत, ज्यामध्ये अधिक सर्वसमावेशक व प्रभावी शैक्षणिक अनुभव देण्यासाठी तंत्रज्ञान व समकालीन अध्ययनाचे उत्तम संयोजन आहे.
प्रत्येक मूल सहाय्यक व उत्साहपूर्ण वातावरणामध्ये प्रगती करण्याची संधी मिळण्यास पात्र असण्याच्या दृष्टीकोनामधून प्रेरणा घेत एचडीएफसी बँक परिवर्तनने विविध सीएसआर उपक्रमांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. या उपक्रमांचा दर्जेदार शिक्षण, पायाभूत सुविधा व कौशल्य विकास उपलब्ध करून देण्याचा मनसुबा आहे.
२०१४ मध्ये स्थापना झाल्यापासून एचडीएफसी बँक परिवर्तनने शाश्वत सामाजिक-आर्थिक विकासामध्ये ५,१०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. शिक्षणाचा प्रसार हा एचडीएफसी बँकेच्या परिवर्तनच्या प्रमुख पाच फोकस क्षेत्रांपैकी एक आहे. इतर चार क्षेत्रे आहेत, ग्रामीण विकास, कौशल्य प्रशिक्षण व उदरनिर्वाह वाढ, आरोग्यसेवा व स्वच्छता आणि आर्थिक साक्षरता व समावेशन. हे आधारस्तंभ १७ युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स (एसडीजी) पैकी ९ एसडीजींशी संलग्न आहेत.