no images were found
दिव्यांगांच्या विशेष शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन संपन्न
कोल्हापूर(प्रतिनिधी) : समाज कल्याण विभागा अंतर्गत चालविणाऱ्या दिव्यांगांच्या विशेष शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी दिवाळी निमित्त टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेत लावण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, शिक्षणाधिकारी (प्राथ.) मीना शेंडकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या साधना कांबळे तसेच दिव्यांग शाळेतील मुख्याधापक उपस्थित होते. यामध्ये रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी डेफ स्कूल, तिळवणी, वि.म. लोहिया मुकबधिर विद्यालय, कोल्हापूर, कर्णबधिर विद्यालय, पेठवडगांव, निवासी मुकबधिर विद्यालय गडहिंगलज, चेतना विकास मंदिर कोल्हापूर, स्वयम मतिमंद मुलांची शाळा, अवधुत विशेष मुलांची निवासी शाळा, अंबप, स्व.गणपतराव गाताडे मतिमंद विद्यालय, कागल, कर्णबधिर विद्यालय शिरोळ, सन्मती मतिमंद विकास केंद्र, इचलकरंजी, जिज्ञासा विकास मंदिर, कोल्हापूर इ. शाळांनी या प्रदर्शनात सहभाग घेतल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी दिली.