
no images were found
थायलंडमध्ये ‘नर्सरी‘त गोळीबार; २२ चिमुकल्यांसह ३४ जणांचा मृत्यू
थायलंडमध्ये लहान मुलांच्या नर्सरीत अर्थात बालवाडीमध्ये गोळीबाराची थरारक घटना घडली असून यामध्ये २२ चिमुकल्यांसह ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. एका माजी पोलीस कर्मचाऱ्याने हा गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, थायलंडच्या ईशान्य प्रातांत ही घटना घडली असून लहान मुलांना सांभाळण्यासाठी असलेल्या एका डे केअर सेंटरमध्ये हा गोळीबार झाला असून यामध्ये ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २२ लहान मुलांचाही समावेश आहे. एका माजी पोलीस कर्मचाऱ्याने हा गोळीबार केला असून नंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडली.
या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये मृत्यू झालेल्या चिमुकल्यांचे पालक टाहो फोडताना दिसतात. काही लोक हे जखमींना रुग्णवाहिकेतून नेत असताना दिसतात तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये पोलीस हल्लेखोराकडे पाहताना दिसत आहेत. लहान मुलांवर अमानुषपणे गोळीबार करणारा हल्लेखोर हा एक माजी पोलीस अधिकारी आहे.