Home सामाजिक कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे रणरागिणींचा गौरव

कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे रणरागिणींचा गौरव

0 second read
0
0
133

no images were found

कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे रणरागिणींचा गौरव

कोल्हापूर :  नारीशक्तीचा कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे केलेला सन्मान हा आमचा अभिमान आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी केले.

नवरात्रोत्सवानिमित्त कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे व्यवसायातील रणरागिणींचा सत्कार करण्यात आला. ज्या घरातील कर्त्या पुरुषाच्या निधनानंतर आज या महिला त्यांचा व्यवसाय समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांचा गौरव केला. त्यावेळी मार्गदर्शन करताना श्री. राठोड बोलत होते.

ते म्हणाले, आमच्या माता-भगिनी घरातील कर्त्या व्यक्तीच्या निधनानंतर आपला पारंपरिक व्यवसाय न डगमगता, अडचणींवर मात करीत सक्षमपणे व्यवसाय पुढे चालवत आहेत. त्या दृष्टीने संघातर्फे या रणरागिणींचा सत्कार करताना आम्हाला अभिमान आहे. येथून पुढेही त्यांना व्यवसाय करताना काही समस्या आल्यास संघ त्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असेल.

श्रीमती मंगल गुंदेशा, छाया हावळ, नूतनदेवी अग्रवाल, शोभा पोवार, अश्विनी भस्मे, ज्योत्स्ना बागल, भाग्यश्री शेळके, जयश्री शेळके, शकुंतला पेडणेकर यांचा सत्कार सौ. नकाते, सौ. प्रेमलता ईश्वर परमार, सौ. अनिता राजेश राठोड, सौ. वर्षा विजय हावळ आणि सौ. प्रभादेवी शिवाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सत्काराप्रती सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली.

सचिव तेजस धडाम यांनी स्वागत करून आभार मानले. यावेळी उपाध्यक्ष विजय हावळ, सचिव प्रीतम ओसवाल, संचालक शिवाजी पाटील, विजयकुमार भोसले, संजय रांगोळे, अशोककुमार ओसवाल, किरण गांधी, विशाल हावळ, संपत पाटील, राजू बारस्कर, दिनकर लाळगे यांच्यासह सभासद उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

यादें ने साजरा केला 100 एपिसोड्सचा टप्पा

यादें ने साजरा केला 100 एपिसोड्सचा टप्पा सोनी सबचा हृदयस्पर्शी ड्रामा यादें ने 100 एपिसोड्…