Home मनोरंजन  कलाकारांनी त्‍यांच्‍या टिकाऊ फॅशन सिक्रेट्सबाबत सांगितले

 कलाकारांनी त्‍यांच्‍या टिकाऊ फॅशन सिक्रेट्सबाबत सांगितले

2 min read
0
0
11

no images were found

 कलाकारांनी त्‍यांच्‍या टिकाऊ फॅशन सिक्रेट्सबाबत सांगितले

 

यंदा दिवाळीला, नेहमीप्रमाणे नवीन कपड्यांची खरेदी करण्‍याऐवजी काहीतरी वेगळे करा, जसे तुमच्‍या जुन्‍या कपड्यांना नवीन स्‍टायलिश लुक देत पुनर्वापर करा. फास्‍ट फॅशनला झपाट्याने प्राधान्‍य मिळत आहे, पण क्रिएटिव्‍हीटी तुमच्‍या विद्यमान वॉर्डरोब्‍समध्‍ये भर करू शकणारे नवीन लुक पाहणे उत्‍साहवर्धक ठरेल. ही शाश्‍वत निवड असण्‍यासोबत तुम्‍हाला तुमच्‍या आवडत्‍या पोशाखाला अधिक आकर्षक बनवण्‍याची संधी देखील मिळते, ज्‍यामध्‍ये खास आठवणी सामावलेल्‍या आहेत. एण्‍ड टीव्‍हीवरील प्रमुख नायिका जसे नेहा जोशी (मालिका ‘अटल’मधील कृष्‍णा देवी वाजपेयी), गीतांजली मिश्रा (मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील राजेश सिंग) आणि शुभांगी अत्रे (मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील अंगूरी भाबी) दिवाळीसाठी क्रिएटिव्‍हीटी कपड्यांना कशाप्रकारे आकर्षक बनवू शकते याबाबत सांगत आहेत. मालिका ‘अटल’मध्‍ये कृष्‍णा देवी वाजपेयीची भूमिका साकारणाऱ्या नेहा जोशीम्‍हणाल्‍या, ”मला माझ्या दिवाळी आऊटफिट्समध्‍ये अधिक आकर्षकतेची भर करायला आवडते. उदाहरणार्थ, माझ्याकडे मरून रंगाची कॉटन साडी आहे, जी मी गेल्‍या वर्षी दिवाळीला नेसली होती आणि यावेळी मी नुकतेच खरेदी केलेल्या मस्‍टर्ड ब्‍लाऊजसोबत ही साडी नेसणार आहे. फक्‍त ब्‍लाऊज बदल्‍याने संपूर्ण लुक किती आकर्षक होऊ शकतो हे पाहणे अविश्‍वसनीय आहे. ही धमाल इथेच थांबत नाही. मी माझ्या आभूषणांना देखील मिसमॅच करणार आहे. मी ऑक्सिडाइज्‍ड चांदीचे दागिने परिधान करणार आहे आणि विलक्षण व आकर्षक लुकसाठी रंगबेरंगी बांगड्या परिधान करणार आहे. मी दिवाळीसाठी नेहमी शॉपिंग करते, पण यावेळी मी होममेड डुपट्टा (ओढणी) किंवा स्‍थानिक कारागीरांकडून अनोखे कानातले अशा विचारशील व लहान वस्‍तूंवर लक्ष केंद्रित केले आहे. अशाप्रकारे, मी परंपरेचा उत्‍साह कायम ठेवेन, तसेच नवीन स्‍टाइल्‍ससह प्रयोग करत सण साजरीकरणाचा आनंद घेईन.” 

मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मध्‍ये राजेशची भूमिका साकारणाऱ्या गीतांजली मिश्रा आपला आनंद व्‍यक्‍त करत म्‍हणाल्‍या, ”यंदा, मी माझ्या कम्‍फर्ट झोनमधून बाहेर पडत मिसमॅच पोशाख व आभूषणांसह प्रयोग करणार आहे. माझ्याकडे चमकदार पिवळ्या रंगाचा लेहंगा आहे, जो मला खूप आवडतो आणि त्‍याच्‍यासोबत परिधान केल्‍या जाणाऱ्या चोलीऐवजी मी गडद मॅजेण्‍टा रंगाचा ब्‍लाऊज परिधान करणार आहे. आकर्षक रंगांचे संयोजन उत्‍सवी साजरीकरणामध्‍ये उत्‍साहाची भर करतात, जे दिवाळीसारख्‍या सणासाठी अगदी योग्‍य आहे. मी आभूषणांना देखील मिक्‍स करते, जसे सोन्‍याच्‍या बांगड्यांसोबत चांदीचे झुमके परिधान करते. सर्व गोष्‍टी परिपूर्णपणे जुळल्‍या पाहिजेत असे कोण म्‍हणते? मी स्‍थानिक बाजारपेठांमधून आकर्षक पोशाख व आभूषणे खरेदी करण्‍याचा आनंद घेते आणि यंदा, मी आकर्षक, विलक्षण आभूषणांचा शोध घेत आहे. फॅशनमधून आपले व्‍यक्तिमत्त्व दिसून येते आणि दिवाळी ते व्‍यक्तिमत्त्व दाखवण्‍यासाठी सर्वात उत्तम वेळ आहे.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील शुभांगी अत्रे ऊर्फ लाडकी अंगूरी भाबी म्‍हणाल्‍या, ”मला दिवाळीला शॉपिंग करायला आवडते, पण यंदा मी या परंपरेमध्‍ये काहीसा बदल करणार आहे. मी माझ्या आकर्षक नारिंगी रंगाच्‍या साडीसोबत कॉंट्रास्ट हिरव्‍या रंगाचा ब्‍लाऊज परिधान करणार आहे आणि नेहमीच्‍या सोन्‍याच्‍या दागिन्‍यांऐवजी मोत्‍यांचे दागिने घालणार आहे. यामध्‍ये माझ्या वॉर्डरोबमधील भावनिक नाते असलेल्‍या जुन्‍या व नवीन पोशाखांचा समावेश असेल, जसे माझ्या आईची शाही निळ्या रंगाची कांजीवरम साडी, ज्‍यासोबत आकर्षक कानातले व रंगबेरंगी बांगड्या अशी आधुनिक, आकर्षक आभूषणे परिधान करणार आहे. मी उत्‍सवासाठी आकर्षक दिसण्‍यासोबत माझ्यासाठी महत्त्वाच्‍या असलेल्या पोशाख व आभूषणांसोबत‍ नवीन आठवणी देखील साठवते.”      

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…