
no images were found
मानिनी डे साकारणार एक आव्हानात्मक भूमिका झी टीव्हीवरील ‘रब से है दुआ’मध्ये
लोकप्रिय अभिनेत्री मानिनी डे ही ‘रब से है दुआ’ ह्या मालिकेमध्ये गझल ह्या एका शक्तीशाली आणि आव्हानात्मक भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. अनेक टेलिव्हिजन शोज् आणि चित्रपटांमधील आपल्या उत्तम अभिनयासाठी मानल्या जाणाऱ्या मानिनीच्या ह्या मालिकेमधील प्रवेशासह आगामी ट्रॅकमध्ये अनेक नाट्यमय वळणे येतील. दुआ (रेमॉन कक्कर) च्या आयुष्यात गझलचे पुनरागमन होत असून त्यामुळे पुन्हा एकदा दुआच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ होणार आहे.
मानिनी म्हणाली, “जेव्हा माझ्याकडे ही भूमिका आली तेव्हा माझ्या असे लक्षात आले की हे एक असे आव्हान असणार आहे जे स्वीकारायला मला निश्चितच आवडेल. जर व्यक्तिरेखा आव्हानात्मक नसेल तर मला मजा येत नाही. विभिन्न व्यासपीठांवर अनेक वर्षांपासून मी काम करत आले असून पुन्हा एकदा जिथून ह्या सगळ्याची सुरूवात झाली तिथे परतताना घरी आल्यासारखे वाटत आहे. हे केवळ महत्त्वपूर्ण पुनरागमन नसून ह्या उद्योगातील माझ्या जवळच्या मैत्रिणी रेमॉन आणि अलका दी यांच्यासोबतची पुनर्भेटही आहे. मी त्यांना गेल्या कित्येक वर्षांपासून ओळखत असून आम्ही जवळच्या मैत्रिणी आहोत. पुन्हा एकदा त्यांच्यासोबत चित्रीकरण करताना अनेक जुन्या आठवणी जाग्या होत असून अतिशय आनंदाने भरलेला अनुभवही प्राप्त होत आहे.”
ती पुढे म्हणाली, “इथे प्रत्येक भूमिका ही नवीन काहीतरी शिकण्याची संधी प्रदान करत असते आणि ‘रब से है दुआ’मुळे मला गझलच्या रूपात माझ्या कलेची एक वेगळी बाजू शोधता येणार आहे. झी टीव्हीवर परत येताना मी अतिशय उत्साहात असून प्रेक्षकांनी आमची ही मालिका पाहावी यासाठी उत्सुक आहे. तसेच, एलएसडी आणि मी मोठ्या काळापासून एकत्र काम करत असून पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करताना आणि ‘रब से है दुआ’चा हिस्सा बनताना मी अतिशय रोमांचित आहे. प्रतीक आणि पार्थसोबत काम करण्यासाठी आणि नवीन उच्चांक प्रस्थापित करण्यासाठी मी उत्सुक आहे.”ह्या मालिकेमध्ये काम करण्याबद्दल मानिनी उत्साहात असून दुआच्या आयुष्यात गझलच्या परत येण्याने काय होईल याची उत्कंठा प्रेक्षकांना वाटत आहे.