no images were found
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह इमारत पुर्नंबांधनी कामाचा आज भूमीपूजन सोहळा
कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह इमारत पुर्नंबांधनी कामाचा सोमवार, दि.14 ऑक्टोंबर 2024 रोजी सकाळी 7.00 वाजता पालकमंत्री यांच्या शुभहस्ते भूमीपूजन सोहळा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व खासदार धनंजय महाडीक, खासदार श्री शाहू छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, अरुण लाड, जयंत आसगांवकर, श्रीमती जयश्री जाधव, ऋतूराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, सहा.आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे.
संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह इमारतीला दि.08 ऑगस्ट 2024 रोजी आग लागली. यानंतर महापालिकेने तातडीने केशवराव भोसले नाटयगृह इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करणेसाठी दि.09 ऑगस्ट 2024 रोजी दरपत्रके (कोटेशन) मागविली. नाट्यगृह इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी 6 सल्लागारांकडून दरपत्रके सादर झाली. त्यापैकी सर्वात कमीचा देकार असलेल्या स्ट्रक्टवेल डिझाईनर्स व कंन्सल्टंट प्रा.लि., नवी मुंबई यांना स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे काम दि.15 ऑगस्ट 2024 रोजी कार्यादेश देण्यात आला. स्ट्रक्टवेल डिझायनर्स व कन्सल्टंट प्रा.लि., नवी मुंबई यांनी प्राथमिक स्ट्रक्चरल ऑडीट अहवाल दि.02 सप्टेंबर 2024 रोजी सादर केला. या नाट्यगृहासाठी दि.10 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी नाटयगृहाच्या पुर्नबांधणी कामी रु.25.00 कोटी निधीची घोषणा केली. संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह इमारतीचे पुर्नबांधणी करण्यासाठी सल्लागार, अनुभवी व तज्ञ वास्तुविशारद यांची नियुक्ती करणे कामी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षते खाली दि.15 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली. यानंतर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह इमारतीचे पुर्नबांधणी करणेकामी सल्लागार, अनुभवी व तज्ञ असलेल्या वास्तुविशारद यांचकडून दि.17 ऑगस्ट 2024 रोजी EOI मागविण्यात आले. खासदार शाहु छत्रपती यांनी संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह पुर्नबांधणी कामी त्यांच्या अध्यक्षतेखाली दि.21 ऑगस्ट 2024 रोजी समिती स्थापन केली. वास्तुविशारद नियुक्ती कामी EOI ला प्रतिसाद मिळून 6 वास्तुविशारद कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या. या सहा निविदांची प्राथमिक छाननी होऊन सर्व 6 निविदाधाराकांना दि.05 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले. वास्तुविशारद नियुक्ती कामी प्राप्त सर्व 6 निविदाधारकांनी सर्वसाधारणपणे 40 ते 45 मिनिटांचे सादरीकरण जिल्हास्तरीय समिती समोर केले. सादरीकरण पूर्ण झाल्यावर जिल्हास्तरी समितीने सदर कंपनीच्या Company Profile, Relevant Work, Idea Concept & Methodology या निकषांच्या आधारे गुणांकन देऊन ए.एन.एल.असोसिटस्,मुंबई व स्ट्रक्टवेल डिझाईनर्स व कंन्सल्टंट, नवी मुंबई या 2 फर्मची संक्षिप्त यादी निश्चित केली. नाटयगृहाच्या सध्याच्या इमारतीमधील उणीवा व इतर सूचना व सुधारणा देणे कामी कोल्हापूर मधील विविध रंगकर्मी व संबंधित व्यक्तींशी जिल्हास्तरीय समिती सोबत दि.06 सप्टेंबर 2024 रोजी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये देणेत आलेल्या सूचना व सुधारणा संक्षिप्त यादीमधील दोन्ही कंपन्यांना कळविणेत आल्या व सदर सूचना व सुधारणांचा समावेश करुन अंतिम सादरीकरण जिल्हास्तरीय समिती समोर दि.13 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर करणेबाबत व सदर दिवशी व्यापारी निविदा सादर करणेबाबत कळविण्यात आले. सदर दोन्ही कंपन्यांचे सादरीकरण जिल्हास्तरीय समितीसमोर करणेत येऊन Presentation, Estimate Detailing, Fulfillment of Requirement, Understanding Scope of Project या निकषांच्या आधारे जिल्हास्तरीय समितीने गुणांकन दिले. त्यानंतर दोन्ही फर्मचे व्यापारी लखोटे (Commercial Bid) व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये सर्व समिती सदस्यांच्या सहयांसह उघडण्यात आले. त्यामध्ये ए.एन.एल.असोसिटस्,मुंबई यांनी अंदाजपत्रकीय दराच्या 7.5 टक्के फि (GST वगळून) तर स्ट्रक्टवेल डिझाईनर्स व कन्सल्टंट प्रा.लि., नवी मुंबई यांनी अंदाजपत्रकीय दराच्या 4.5 टक्के फि (GST वगळून) इतर सर्व करांसह दर सादर केले. तसेच स्ट्रक्टवेल डिझाईनर्स व कंन्सल्टंट प्रा.लि. यांनी सादर केलेल्या दराबाबत वाटाघाटी (Negotiation) करण्यास तयार असलेबाबतचे पत्र कंपनीने दिले. व्यापारी निविदाचा प्रतिसाद लक्षात घेऊन दोन्ही निविदाधारकांना गुणांकन देण्यात आले. यानंतर स्ट्रक्टवेल डिझायनर्स व कन्सल्टंट प्रा.लि.नवी मुंबई यांचे गुणांकन जास्त असल्याने त्यांना दराबाबत वाटाघाटीसाठी पत्र देण्यात आले. वाटाघाटी अंती स्ट्रक्टवेल डिझायनर्स व कन्सल्टंट प्रा.लि.नवी मुंबई यांनी प्रकल्प किंमतीच्या 4.25 टक्के फि (GST वगळून) दर सादर केला. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह व राजर्षी शाहु खासबाग कुस्ती मैदान नुतनीकरण, जतन, संवर्धन व पुर्नबांधणी करणे कामाचे सादरीकरण खासदार शाहू छत्रपती यांचे अध्यक्षतेखाली छत्रपती ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडले. या सादरीकरणास जिल्हास्तरीय समितीचे सदस्य तसेच सुकाणू समितीचे सदस्य उपस्थित होते. यानंतर महाराष्ट्र शासनाने शासन निर्णयान्वये महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकासासाठी विशेष तरतुद करुन कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह व राजर्षी शाहु खासबाग कुस्ती मैदान नुतनीकरण, जतन, संवर्धन व पुर्नबांधणी करणे कामी रु.25.10 कोटी निधी मंजूर करण्यात आला. या मंजूर रु.25.10 कोटी पैकी पहिल्या टप्यामध्ये रु.7.35 कोटीचा प्रस्ताव प्रस्तावास जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता दिली. या प्रशासकीय मान्यतेनुसार संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह व राजर्षी शाहु खासबाग कुस्ती मैदान नुतनीकरण, जतन, संवर्धन व पुर्नबांधणी करणे कामाची निविदा प्रसिध्द करण्यात आली. या निविदेचे दि.03 ऑक्टोंबर 2024 दि. 04 ऑक्टोंबर 2024 रोजी आयुक्त कार्यालय मिटिंग हॉल येथे प्रिबीड बैठक घेण्यात आली. या कामाची निविदा उघडणेत येऊन सदर कामी लक्ष्मीहेरिकॉन प्रा.लि.,मुंबई, गुब्बी सिव्हिल इंजिनिर्स, व डेल्टा एन्टरप्रायजेस मुंबई या 3 निविदा प्राप्त झाल्या. तांत्रिक छाननी समितीच्या अहवालानुसार पात्र 2 निविदा धारकांचे व्यापारी लखोटे उघडण्यात आले लक्ष्मीहेरिकॉन प्रा.लि.,मुंबई यांनी अंदाजपत्रकीय दराच्या 0.99 टक्के कमी दराची निविदा सादर केली व गुब्बी सिव्हिल इंजिनिर्स, मुंबई यांनी अंदाजपत्रकीय दराच्या 20 टक्के अधिकची निविदा सादर केली असलेचे दिसून आले. त्यानुसार सर्वात कमी देकाराचे निविदाधारक लक्ष्मी हेरिकॉन प्रा.लि.,मुंबई यांची अंदाजपत्रकीय दराच्या 0.99 टक्के इतक्या कमी दराची निविदा मंजूर करण्यात येऊन त्यांना कार्यादेश आज देण्यात येणार आहे.