Home शासकीय पंधरा मिनिटे मतदार जनजागृतीसाठी : मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी

पंधरा मिनिटे मतदार जनजागृतीसाठी : मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी

18 second read
0
0
26

no images were found

पंधरा मिनिटे मतदार जनजागृतीसाठी : मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी

 

कोल्हापूर :  जिल्ह्यातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरीकांनी आपल्या बहु‌मुल्य वेळेतील पंधरा मिनिटे देऊन आपल्या व आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची नावे मतदार यादीत असल्याबाबत खात्री करावी,  असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, अमोल येडगे यांनी केले आहे.

सक्षम लोकशाहीसाठी प्रत्येक नागरीकांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग नोंदविणे व नैतिकतने मतदान करणे ही लोकशाहीची मुलभुत गरज आहे, आपण व आपल्या कुटुंबातील सदस्य, आपले परिचित, आपला मित्र परिवार, आपल्या शहरातील, जिल्ह्यातील व राज्यातील सर्व पात्र प्रौढ नागरिक मतदान प्रक्रियेत सहभागी झाले तर लोकप्रतिनिधी निवडण्याची आदर्श प्रक्रिया राबविली जाऊन याव्दारे लोकशाहीचा पाया भक्कम करण्यामध्ये आपण महत्त्वाची भूमिका बजाऊ शकता.

यासाठी आपण आपल्या दैनंदिन कामकाजातून केवळ पंधरा मिनिट दिल्यास मतदार यादांमध्ये आपले व आपल्या परिवारातील सदस्यांचे नाव असल्याची खात्री करून घेता येईल व आगामी विधानसभा निवडणूक २०२४ च्या मतदान प्रक्रियेत सहभागी होता येईल. आपले नाव मतदार यादीत आहे का हे पाहण्यासाठी आपण कुठल्याही निवडणूक कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/   या वेबसाईटवर किंवा Voter Helpline या अॅपवर अत्यंत सुलभतेने नाव असल्याची खात्री करता येते. तसेच मतदार यादीत आपले नाव नसल्यास अथवा तपशिलात काही चूक झाली असल्यास अर्ज करता येईल. नमुना क्रमांक ६ (मतदार यादीत नांव सामाविष्ट करावयासाठी अर्ज), नमुना क्रमांक ७ (मतदार यादीतील नांवाची वगळणी करावयासाठी अर्ज), नमूना क्रमांक ८ (मतदार यादीतील तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी तसेच मतदार यादीतील आपले नाव एका यादी भागातून दूसऱ्या यादी भागात स्थलांतरीत करण्यासाठी अर्ज) या प्रमाणे करता येईल.

नागरीकांनी आपले आवश्कतेप्रमाणे वरील नमुन्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा संबंधित तालुक्यातील तहसिल कार्यालय (निवडणूक शाखा) व कोल्हापूर शहराच्या हद्दीमध्ये रहिवास करत असलेल्या मतदारानी एल.बी.टी शाखा शिवाजी मार्केट, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर यांच्याकडे सादर करावेत किंवा आयोगाने विकसित केलेल्या https://voters.cci.gov.in/    यावर अथवा Voter Helpline App या अँपवर ऑनलाईन पध्दतीने सादर केल्यानंतर त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…