Home सामाजिक कंदमुळांमध्ये शरीराला आवश्यक औषधी गुणधर्म : डॉ. बी. धीरज कुमार:दोन दिवसीय कंदमुळ महोत्सवाचे उद्घाटन

कंदमुळांमध्ये शरीराला आवश्यक औषधी गुणधर्म : डॉ. बी. धीरज कुमार:दोन दिवसीय कंदमुळ महोत्सवाचे उद्घाटन

0 second read
0
0
9

no images were found

कंदमुळांमध्ये शरीराला आवश्यक औषधी गुणधर्म : डॉ. बी. धीरज कुमार:दोन दिवसीय कंदमुळ महोत्सवाचे उद्घाटन

कोल्हापूर(प्रतिनिधी):मी बॉटनीचा विद्यार्थी आहे. तरीही कंदमुळांची इतकी माहिती मला नव्हती. दैनंदिन जीवनामध्ये कंदमुळांचा वापर केला पाहिजे. कारण बॉटनीचे शिक्षण घेताना शरीराला स्टार्च आणि फायबरची आवश्यकता असते. हे शिकलो होतो.ही गुणकारी पोषक द्रव्ये कंदमुळामध्ये असतात. याची फारशी माहिती कोणाला नाही. आपल्याला कंदमुळांचा विसर पडलेला आहे. पण कोल्हापुरातील या २५० हून अधिक महत्त्वपूर्ण कंदमुळांच्या प्रदर्शनामुळे पुढच्या पिढीला याची माहिती होईल. कंदमुळांमध्ये औषधी गुणधर्म असतात. जे आपल्या शरीराला आणि आरोग्याला आवश्यक असतात. असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बी धीरज कुमार यांनी केले. दोन दिवस चालणाऱ्या कंदमूळाच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

भारताला खूप मोठा इतिहास आहे.यामध्ये लुप्त होत चाललेल्या प्राचीन कंदमुळांचा शोध लावून तब्बल २५० हून अधिक कंदमुळांचे प्रदर्शन कोल्हापुरात भरवले गेलेले आहे. कोल्हापूरवासियांना या कंदमुळाच्या महोत्सवाची पर्वणी बघायला मिळणार आहे. हा उपक्रम कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन कोल्हापूरच्या प्रथम नागरिक महापौर सौ. रूपाराणी निकम यांनी उद्घाटन प्रसंगी केले.
कंदमुळे प्रदर्शनाचे हे चौथे वर्ष आहे. जेव्हा पहिले प्रदर्शन भरवले तेव्हा महाराष्ट्रातील हे एकमेव प्रदर्शन होते. मोहन माने यांच्या प्रयत्नातून पाच राज्यांसह महाराष्ट्रातील २५० कंदमुळे या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.आदिमानव काळापासून अगदी रामायण महाभारतातमध्ये देखील कंदमुळाचा उल्लेख आहे. या औषधी व पौष्टिक कंदमुळांची ओळख व्हावी, त्याची शेती व्हावी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्याचा शास्त्रीय अभ्यास व्हावा. यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.असे निसर्ग अभ्यासक डॉ. मधुकर बाचूळकर यांनी सांगितले.

“लेट्स गेट बॅक टु अवर रूट्स “ह्या ब्रीदवाक्याचा अंगिकार करून आपल्या मातीत वाढणाऱ्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आरोग्यवर्धक कंदमुळांची माहिती घेऊन चौकस आहारातून सुदृढ पिढी घडवण्यासाठी विद्यार्थी, अबालवृद्ध तसेच सर्व नागरिकांनी या एकमेव वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाचा लाभ अवश्य घ्यावा असे आवाहन “एनजीओ कम्पॅशन २४”, “कोल्हापूर वुई केअर “चे अध्यक्ष मिलिंद धोंड ह्यांनी केले आहे.

निसर्गअंकुर,कोल्हापूर वुई केअर एनजीओ कम्पॅशन २४ ह्या संस्थेच्या आयोजनातून तसेच श्री. शाहू छत्रपती शिक्षण संस्था,गार्डन्स क्लब ,युथ ऍनेक्स , वुई केअर हेल्पलाईन या संस्थांच्या सहकार्याने २५०हून अधिक कंदमुळांचे माहितीपूर्ण शास्त्रीय प्रदर्शन कोल्हापूर शहरातील शहाजी कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृह,दसरा चौक येथे आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात कणगा ,काटे कणंग ,कोराडू ,करांदा, वराहकंद ,वासकंद ,पासपोळी , शेंडवेल ,कडुकंद, आळसी ,शेवळा , सुरण ह्या वनस्पतींची कंदमुळे , हवाई बटाटे, कंदीका आणि कंदक तसेच मोठा कासार अळू ,काळा अळू ,हिरवा अळू ,पांढरा पेरव , उंडे ,शेडवाळे असे अळुंचे विविध प्रकार आणि त्यांचे कंद , त्याचबरोबर काळी हळद ,आंबेहळद ,रानहळद ह्या सारखे हळदीचे विविध प्रकार व त्यांचे कंद तसेच अमेरिकन अळू, चिनी बटाटे इ.विदेशी कंदमुळे अशाप्रकारच्या सुमारे २५० हुन अधिक प्रकारच्या कंदाच्या जाती, प्रजातींची मांडणी केली आहे.
कंदमुळांपासून बनवलेले खाद्यपदार्थ त्याच्या पाककृती या प्रदर्शनात पाहता येतील. हे खाद्यपदार्थ खाण्यासाठी उपलब्ध असतील. काही कंदमुळे विक्रीसाठी ही असतील. रानभाज्या, वृक्ष आणि औषधी वनस्पतींची माहिती असणारी पुस्तके विक्रीसाठी येथे उपलब्ध असतील. कर्नाटक, ओरिसा, तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र राज्यातील कंदे येथे ठेवण्यात आली आहे.
गार्डन्स क्लब,सौ.मंजिरी कपडेकर कूकींग क्लासेस , प्रा. डॉ. एन. डी.पाटील महाविद्यालय, मलकापूर ,युथ ऍनेक्स आणि वुई केअर हेल्पलाईन या संस्थांचे सहकार्य प्रदर्शनास लाभले आहे.
सकाळी १० ते ७ वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आणि विनामूल्य आहे. वुई केअरचे प्रमुख मिलींद धोंड,निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.मधुकर बाचुळकर, मोहन माने,गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, भूषण पाटील,अभिजीत पाटील, अमृता वासुदेवन, सुप्रिया भस्मे आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

परिवहन समिती सदस्य रोहन अतिग्रे यांच्याकडून त्या चालक वाहकांचा सत्कार..:कौतुकाची थाप पाठिवर पडल्याने चालक आणि वाहक भारावले..

परिवहन समिती सदस्य रोहन अतिग्रे यांच्याकडून त्या चालक वाहकांचा सत्कार..:कौतुकाची थाप पाठिव…