
no images were found
शिवाजी विद्यापीठ,समाजकार्य अभ्यासक्रमाच्या विध्यार्थ्यांच्या ‘गावसहभागी मूल्यावलोकन’ शिबिरास उंड्री येथे सुरुवात….
कोल्हापूर (प्रतिनिधि): शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कुल ऑफ रूरल डेव्हलपमेंट अधिविभागाच्या समाजकार्य अभ्यासक्रमांतर्गत गावसहभागी मूल्यावलोकन शिबिर (PRA) ची मौजे उंड्री, ता. पन्हाळा, जि.कोल्हापूर येथे सुरुवात झाली आहे. हे शिबिर दि. ०७/१०/२०२४ ते ११/१०/२०२४ या कालावधीमध्ये पार पडणार असून सदर शिबीरांर्तगत समाजकार्य अभ्यासक्रमाचे विद्यार्थी गावचा सूक्ष्म अभ्यास करून गावच्या विकासास उपयुक्त कार्यक्रम राबविणार आहेत. गावसहभागी मूल्यावलोकन’ शिबिरामध्ये गावातील लोकांचा सहभागातून गाव व गावाच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यात येते. गाव सहभागातूनच गावाचा विकास शक्य आहे अशी भावना लोकांमध्ये रुजवण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये समाजकार्य अभ्यासक्रमाचे विध्यार्थी गावपातळीवर काम करणाऱ्या सर्व संस्थाना भेटी देवून गावाच्या विकासातील त्या संस्थाचा सहभाग याचा अभ्यास करतील. यामध्ये शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्वस्त धान्य दुकान, सहकारी संस्था, वाचनालय, दुध उत्पादक संस्था, ग्रामपंचायत यांना भेटी देतील व त्यांचा हवाच्या विकासातील सहभागाचा अभ्यास करतील. तसेच गावफेरी, मशालदिंडी, शिवारफेरी, ग्रामबैठक व पथनाट्या च्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम करतील. याचबरोबर गावातील विविध घटकातील नागरिकांसोबत बैठका घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन उपाययोजना सुचवतील.
यामध्ये शेतकरी बैठक, अनुसूचित जाती व जमाती समुदायाची बैठक, जेष्ठ नागरिक बैठक, महिला बैठक, युवक व युवती बैठक, स्वयंसहायता गटाची बैठका घेण्यात येतील. या शिबिरादरम्यान विविध प्रकारचे टाकते बनवून गावगाडा समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल. गावानकाशा, शिवार संसाधनाचा नकाशा काढून गावकर्यांच्या नजरेतुन गाव समजून घेतला जाईल. या शिबिराचा समारोप गावाच्या विकासासाठी गावकऱ्यांचा सहभाग वाढवा यासाठी ग्रामसभा घेवून होईल. या शिबिराचे समन्वयक प्रा. डॉ. उमेश गडेकर सहायक संचालक/सहायक प्राध्यापक, शिवाजी विद्यापीठ हे असून गावातील सरपंच सौ. रंजना यादव, उप सरपंच उज्वला कांबळे, पोलीस पाटील शहाजी कुदळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष संदीप यादव, सोसायटी चेअरमन विजय मोरे, माजी सरपंच शहाजी यादव, शरद मोरे, ग्रामपंचायत सदस्य अजित खोत आणि नयन यादव, जेष्ठ नागरिक दादासो पाटील, मुख्याध्यापक शामराव पाटील, आणि सर्व ग्रामस्थ यांनी हे शिबिर आयोजन करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. या शिबिरामध्ये समाजकार्याचे किरण काळे, रोहित दळवी, सिद्धांत माने, श्रुतिका जाधव, अर्पिता सावंत, तेजा करवाळ, इशा थोरात, अपेक्षा कांबळे, आराधना भालेराव, श्रेया झांबरे, पोर्णिमा धापशी, सुगरा लाडवी , सानिया मिरजकर आणि प्रगती कांबळे हे विध्यार्थी सहभागी झाले आहेत.