
no images were found
डीकेटीईच्या टेक्स्टाईल विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये दैदीप्यमान यश
इचलकरंजी(प्रतिनिधी) ः डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा व बी.टेक. टेक्सटाईलमधील विद्यार्थ्यांनी श्रीनिवासन ट्रस्ट, कोईमतुर यांच्या वतीने आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा ‘टेक्स्टाईल क्विझ – २०२४’ या स्पर्धेमध्ये सहभाग घेवून डिप्लोमा टेक्स्टाईलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक व बी.टेक. टेक्स्टाईलच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांकाचे बक्षिस संपादन केले आहे. दोन्ही गटांना रुपये २५ हजार चे पारितोषिक देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेमध्ये देशभरातील विविध राज्यातील अनेक महाविद्यालयातून ७० गट आणि ९० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या सर्व स्पर्धेमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करीत डीकेटीईच्या विद्यार्थ्याना प्रथम व द्वितीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.
या प्रश्नमुजेषा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांची वस्त्रोद्योग तंत्रज्ञानाशी निगडीत स्पिनिंग, विव्हींग, प्रोसेसिंग आणि गारमेंट या संदर्भातील ज्ञानाची विविध चाचण्यांद्वारे तपासणी करण्यात आली. त्यातून सर्वोत्तम कामगिरी करणा-या गटाला विजयी म्हणून घोषित करण्यात आले. टेक्स्टाईल डिप्लोमा मध्ये शिकणा-या प्रतिक अर्जुन, अतिक कलावंत तर बी.टेक. टेक्स्टाईल मधील त्रिगुण पुजारी व पारस मलमे या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला व दैदीप्यमान यश संपादन केले.
डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांना नेहमीच विविध स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्याचप्रमाणे अशा विविध टेक्नीकल विषयांवर डीकेटीई विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे अयोजन करीत असते यामुळे विद्यार्थ्यांना अशा स्पर्धेमध्ये अव्वल स्थान मिळविणे सहज शक्य होते.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, सचिव डॉ सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी अभिनंदन केले. या प्रश्नमुजेषेसाठी विद्यार्थ्यांना संचालिका डॉ सौ. एल.एस. आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ. यु. जे. पाटील, डिप्लोमा विभागप्रमुख प्रा. आर. के. वळसंग, प्रा. गौरी कुलकर्णी, प्रा. आर.एच देशपांडे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.