Home सामाजिक वन्यजीवांचे रक्षण आपले कर्तव्य –  रामानुजम वन्यजीव सप्ताहाचा एनआयटीमधून शुभारंभ

वन्यजीवांचे रक्षण आपले कर्तव्य –  रामानुजम वन्यजीव सप्ताहाचा एनआयटीमधून शुभारंभ

9 second read
0
0
114

no images were found

वन्यजीवांचे रक्षण आपले कर्तव्य –  रामानुजम

वन्यजीव सप्ताहाचा एनआयटीमधून शुभारंभ

 

  कोल्हापूर ( प्रतिनिधी ):-महाराष्ट्र वनविभागाच्या वतीने १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जाणाऱ्या वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमधून झाला. मुख्य वनसंरक्षक तथा सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्र कोल्हापूर क्षेत्रसंचालक आर. एम. रामानुजम (आय. एफ. एस.) हे प्रमुख उद्घाटक होते. वनविभाग कोल्हापूरचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद (आय. एफ. एस.), विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) श्रीकांत पवार, संस्थेचे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील, एनआयटी संचालक डाॅ. संजय दाभोळे, मानद वन्यजीव रक्षक रमण कुलकर्णी, मुख्याध्यापक उदयकुमार संकपाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. जसे आपल्या घरात बाहेरील कोणी अतिक्रमण केलेले आपल्याला अजिबात खपत नाही, तसे वन्यजीवांचे घर म्हणजेच जंगलात मानवाने अतिक्रमण करून चालणार नाही. वन्यजीवांच्या रक्षणासाठी जंगलांचे जतन करणे आपले महत्त्वाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन रामानुजम यांनी केले. वन्यजीव तसेच पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांच्या मार्फत कृतिशील उपक्रम राबवू अशी ग्वाही चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांनी बोलताना दिली.

       यावेळी सह्याद्री वनक्षेत्रातील महत्त्वाचा वन्यजीव बिबट्याची प्रतिकृती असलेला चित्ररथ आणि पश्चिम घाटातील वन्यजीवांचे माहितीपट स्क्रिनवर दाखवणारा रथ यांना मान्यवरांनी झेंडा दाखवून मार्गस्थ केले. या रथांसोबत न्यू माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सायकल रॅली आणि एनआयटीच्या विद्यार्थ्यांची पायी रॅली निघाली. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी वन्यजीव रक्षणाच्या घोषणा दिल्या. कार्यक्रमास प्रदीप कोकितकर, अविनाश तायनाक, मनोजकुमार कोळी, सुषमा जाधव, नंदकुमार नलवडे, अनिल मोहिते, प्रशांत आवळे, रमेश कांबळे, नंदकुमार भोसले, पल्लवी चव्हाण, विशाल पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व परिक्षेत्र वन अधिकारी उपस्थित होते. रमण कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अमोल कुलकर्णी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास विशेष परिश्रम घेतले. प्रा. माधुरी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अधिष्ठाता डाॅ. नितीन पाटील, एनआयटी ग्रीन क्लब समन्वयक प्रा. सुभाष यादव, विभागप्रमुख, स्टाफ व सर्व विद्यार्थी उपस्‍थित होते. या सप्ताहात संपूर्ण जिल्हाभर वन्यजीव रक्षण जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…