Home मनोरंजन सीरत कपूरसोबत ट्‌वीनिंग करत धीरज धूपार झळकला लाल पेहरावामध्ये ‘रब से है दुआ’च्या लग्नामध्ये

सीरत कपूरसोबत ट्‌वीनिंग करत धीरज धूपार झळकला लाल पेहरावामध्ये ‘रब से है दुआ’च्या लग्नामध्ये

5 second read
0
0
96

no images were found

सीरत कपूरसोबत ट्‌वीनिंग करत धीरज धूपार झळकला लाल पेहरावामध्ये ‘रब से है दुआ’च्या लग्नामध्ये

झी टीव्हीवरील ‘रब से है दुआ’मध्ये सुभानच्या भूमिकेत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असलेल्या धीरज धूपारने हल्लीच कथानकातील सध्या सुरू असलेल्या लग्नाच्या ट्रॅकमधील आपल्या लूकची झलक दिली आणि चाहत्यांना थक्क केले. पूर्णपणे लाल पेहराव केलेल्या धीरजने भारतीय विवाहांमध्ये प्रेम आणि परंपरांचा सांकेतिक रंग असलेल्या लाल रंगाची आपल्या पेहरावासाठी निवड केली. त्याची लाल शेरवानी सोबत लाल चुडीदार आणि मॅचिंग मोजडी यांनी भव्य भारतीय विवाहाचे सार अगदी अचूकपणे टिपले जिथे लाल रंगाला सांस्कृतिक महत्त्व आहे.

ह्या दृश्यामध्ये, जिथे सुभानचे लग्न मन्नत सीरत कपूर सोबत लग्न होणार असून दोन्ही कलाकार रंगसंगती करून लाल रंगाच्या पेहरावांमध्ये दिसून येतील आणि अर्थातच लग्नसमारंभांमध्ये हा रंग एक अतिशय आकर्षक क्षण निर्माण करेल.

धीरज म्हणाला, “लाल हा एक शक्तीशाली रंग आहे आणि त्यातून प्रेम, उत्कटता आणि परंपरांचा संकेत मिळतो, तेही खासकरून भारतीय लग्नांमध्ये. त्यातून आनंद, तीव्रता आणि आत्मविश्वास दिसून येतो आणि त्यामुळे लग्नाच्या ट्रॅकसाठी तो एक सुयोग्य निवड ठरतो. आपला असा एक वेगळा प्रभाव निर्माण करत हा रंग स्क्रीनवर जसा दिसतो त्यामध्ये निश्चितपणे एक प्रकारचा प्रभावीपणा आहे.” धीरज लाल रंगामध्ये झळकत असून आगामी भागांमध्ये इबादत येशा रूघानी सुभान आणि मन्नत यांचे लग्न थांबवण्यासाठी बोल्ड पाऊल उचलत असताना प्रेक्षक खूप साऱ्या नाट्‌याची अपेक्षा करू शकतात.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …