Home सामाजिक भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून गरजू घटकांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न, – सौ. अरुंधती महाडिक

भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून गरजू घटकांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न, – सौ. अरुंधती महाडिक

9 second read
0
0
30

no images were found

भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून गरजू घटकांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न, – सौ. अरुंधती महाडिक

 

कोल्हापूर ( प्रतिनिधी ):-महिला सक्षमीकरणासाठी गेल्या पंधरा वर्षापासून आपण प्रयत्नशील आहोत. तसेच भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून कष्टकरी वर्गाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी येत्या वर्षभरात विविध योजना राबवल्या जाणार आहेत. सहकार से समृद्ध हे ब्रिद घेऊन कार्यरत असणार्‍या भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून गरजू घटकांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी सांगितले. भागिरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेप्रसंगी त्या बोलत होत्या.

        खासदार धनंजय महाडिक युवाशक्ती प्रणित भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून सौ. अरुंधती महाडिक यांनी गेल्या पंधरा वर्षापासून जिल्ह्यातील ३४ हजार महिलांच संघटन केलंयं. त्याचबरोबर त्या महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम गेल्या १५ वर्षापासून सुरू आहे. आता एक पाऊल पुढे टाकत, भागीरथी नागरी सहकारी पतसंस्था ९ जून २०२३ ला सुरू झालीय. वर्षभरात सुमारे ३ हजार सभासदांची नोंदणी या संस्थेकडे झाली. आज या संस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कावळा नाका इथल्या संस्थेच्या प्रांगणात पार पडली. संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक, तज्ञ संचालक पृथ्वीराज महाडिक, संचालिका वैष्णवी महाडिक, मंजिरी महाडिक, संचालिका संयोगिता निंबाळकर, प्रियांका अपराध, पुष्पा पवार, भाग्यश्री शेटके, प्राजक्ता घोरपडे, स्मिता माने, अर्पिता जाधव, मंगल बनसोडे, सीए आदिती मगर यांच्या उपस्थितीत सभा झाली. संस्थेचे जनरल मॅनेजर आर. डी. पाटील यांनी प्रस्तावना केली. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मीडटाऊनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संचालक मंडळाच्या हस्ते सौ. अरुंधती महाडिक यांचा सत्कार करण्यात आला.  प्रथम वर्षातच संस्थेने भरारी घेतली आहे. संस्थेच्या माध्यमातून गरजूंना व्यवसायासाठी अर्थसहाय्य करत, सभासदांना सक्षम करण्याच काम संस्थेकडून होत आहे. वर्षभरात सभासद वाढवणे, सभासदांना अपघाती – आरोग्य विमा देणे, यासह विविध योजना सुरू करणार असल्याचं तज्ञ संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी सांगितलं. दरम्यान समाजातील विविध दुर्बल घटकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा पतसंस्थेचा प्रयत्न आहे. यासाठी भविष्यात पतसंस्थेतर्फे नवनवीन योजना सुरू करणार आहे.  संस्थेतर्फे सप्टेंबर पासून लखपती योजना सुरू केलीय. त्या माध्यमातून बचती सोबतच मोठी रक्कम सभासदांना मिळेल, असा विश्वास संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केला. दरम्यान सर्व विषयांना सभासदांनी एकमुखाने मंजूरी दिली. संस्थेच्या लखपती योजनेच्या माहिती पत्रकाचे अनावरण संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आलं. तसेच या योजनेविषयी विस्तृत माहितीही देण्यात आली. यावेळी प्रशांत आयरेकर यांच्यासह संस्थेच्या सभासद आणि हितचिंतकांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचे कौतुक केले. यावेळी संस्थेचे संचालक, सभासद आणि संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…