Home शैक्षणिक रिसर्च मेथोडॉलॉजीवर शिवाजी विद्यापीठात आज कार्यशाळा

रिसर्च मेथोडॉलॉजीवर शिवाजी विद्यापीठात आज कार्यशाळा

2 second read
0
0
33

no images were found

रिसर्च मेथोडॉलॉजीवर शिवाजी विद्यापीठात आज कार्यशाळा

कोल्हापूर(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी येथे उद्या, शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० ते  ५.०० या वेळेत इंजिनियरिंग व टेक्नॉलॉजी मधील पदवी, पदव्युत्तर तसेच पी. एच. डी. संशोधक विद्यार्थ्यांसाठी रिसर्च मेथोडॉलॉजी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेचे आयोजन प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान ( पी एम उषा) या अंतर्गत रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल, डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या मार्फत इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल व सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस, शिवाजी विद्यापीठ यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळेस कोणतेही शुल्क नाही. सदर कार्यशाळेसाठी नामवंत तज्ज्ञ उपस्थित राहणार असून  इंजिनियरिंग व टेक्नॉलॉजीमधील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक प्रा. डॉ. एस. एन. सपली यांनी केले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीकरीता कार्यशाळेचे समन्वयक हर्षवर्धन पंडित यांच्याशी संपर्क साधावा.

 
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…