no images were found
फार्मासिस्ट हा आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा -मा.महेश सावंत
कोल्हापूर( प्रतिनिधी):-येथील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये मोठ्या उत्साहात जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये सप्ताहाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त भव्य अशी औषध जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीतून लोकांमध्ये जनजागृतीसाठी औषधांचे दुष्परिणाम, औषधांचे डोस ,पेशंट कौन्सिलिंग या विषयावर प्रबोधन करण्यात आले. यानिमित्त परिसरातील विविध औषध दुकानांना भेटी देऊन फार्मासिस्टना शुभेच्छा देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना उद्योगपती महेश सावंत यांनी फार्मासिस्ट चे आरोग्य व्यवस्थेतील महत्त्व, समाजातील त्याची भूमिका, कार्य, औषध व्यवसायातील संकल्पना व व्यवसाय प्रामाणिकपणे कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा. अमर पाटील यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच ज्ञान व कौशल्य विकसित व संपादन करण्यावर भर देऊन यशस्वी फार्मासिस्ट व्हावे. तसेच फार्मसी मधील विविध करिअरच्या संधी, औषधांचे दुष्परिणाम त्यांचे माहिती संकलन यांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून करण्यात आली, याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य रवींद्र कुंभार यांनी जागतिक फार्मासिस्ट दिवसाचे महत्त्व ,का साजरा करण्यात येतो व फार्मासिस्टचे समाजातील योगदान याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजाश्री पाटील यांनी केले.तसेच यावेळी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. पियूषा नेजदार ,प्रा. दिव्या शिर्के,प्रा. वैष्णवी नीवेकर, प्रा. निकिता शेटे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी उपस्थित होत्या.