no images were found
डी वाय पाटील ग्रुपच्या ७ महाविद्यालयांमध्ये
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ
कोल्हापूर (प्रतिनिधी): -डी वाय पाटील ग्रुपमधील सात महाविद्यालयांमध्ये गुरवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक फ्युचर स्किलचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
डी वाय पाटील ग्रुपच्या डी. वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कसबा बावडा, डी वाय पाटील पॉलिटेक्निक बावडा, डी वाय पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी, डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग साळोखेनगर, डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदे, डॉ. डी वाय पाटील इन्स्टिट्यूट फॉर शुगर अँड अलाईड प्रोडक्ट टेक्नॉलॉजी, गगनबावडा, डी वाय पाटील ऍग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी तळसंदे या ठिकाणी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना बाजारात मागणी असलेल्या अत्याधुनिक कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सुमारे तीन महिन्यांचे हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना शासकीय प्रमाणपत्र दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणे आणि स्वावलंबी बनवणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे.
‘कौशल्य विकास’ या संकल्पनेचा लाभ राज्यातील युवक-युवतींना व्हावा, या दृष्टिकोनातून राज्यामधील नामांकित महाविद्यालयांत ही केंद्रे स्थापन केली आहेत. महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजनकौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर ही केंद्रे काम करतील. या केंद्रांमधून मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे.
डी. वाय. पाटील ग्रुपमधील विविध महाविद्यालयामध्ये झालेल्या या कौशल्य विकास केंद्रांच्या या उद्घाटन समारंभाला डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ.अनिल कुमार गुप्ता, कुलगुरू डॉ. के प्रथापन, प्रभारी कुलगुरू डॉ.राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, डॉ. जे. ए. खोत, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. आर. पावस्कर, डॉ. अभिजीत माने, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, प्राचार्य डॉ. महादेव नरके, प्राचार्य डॉ. सुरेश माने, प्राचार्य श्री रुधिर बारदेसकर, श्री निवास पाटील, डॉ . एल. व्ही. मालदे, डी. वाय. पाटील ग्रुपच्या कौशल्य विकास विभागाचे समन्वयक राजन डांगरे, विराज पसारे, योगेश चौगुले, अजय बंगडे, अक्षय शिंदे, डॉ.संग्राम पाटील, गणपती धुमाळ यांच्यासह विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.