
no images were found
शहापूर येथे युवकाचा धारदार हत्याराने खून
कोल्हापूर : जिल्ह्यात खूनसत्र सुरूच आहे. इचलकरंजी जवळ शहापूर येथे सुरज बबन कांबळे (वय वर्ष २७,रा. रेणुकानगर झोपडपट्टी ) या तरुणाचा मंगळवारी खून झाला आहे.तो वहिफनी कामगार होता. ही हत्या आर्थिक देवाण-घेवाण मधून झाल्याचे पोलीसांनी सांगतले.
यड्राव फाटा ते पंचगंगा साखर कारखाना या रस्त्यावर शाहपूर ओढ्यात एका तरुणाचा मृतदेह पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली असता
तरुणाचा मृतदेह दिसून आला. त्याच्या डोक्यावर व तोंडावर तीक्षण शस्त्रानी वार करण्यात आले होते. या घटनेने परिसरात खलबळ उडाली आहे. घटनास्थळी बघ्याची मोठी गर्दी झाली होती.