no images were found
भू-समाधी घेतलेले बाबा पुरूषोत्तमानंद ७२ तासानंतर सुखरूप बाहेर
भोपाळ : मध्यप्रदेशमधील बाबा पुरूषोत्तमानंद यांनी जवळपास ७ फूट खोल खड्ड्यात भू-समाधी घेतली होती. त्यानंतर ते आता तब्बल ७२ तासानंतर बाहेर आले. त्यांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमा झाली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. तर तब्बल येवढ्या काळानंतरही ते सुखरूप बाहेर आले आहेत.
पुरूषोत्तमानंद बाबाने ३० सप्टेंबर रोजी जिवंत समाधी घेतली होती. त्यांना समाधी घेण्यासाठी तब्बल सात फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. त्यानंतर ते आज या समाधीतून बाहेर आले. तब्बल ७२ तासांच्या कठोर तपश्चर्येनंतर ते बाहेर आले असून त्यांच्या दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी जमा झाली आहे. त्यांना आवरण्यासाठी पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
या बाबांना समाधी घेणापूर्वी पोलिसांनी अडवले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून शपथपत्र लिहून घेतल्यानंतर समाधी घेण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.