no images were found
महिलेचे शीर धडावेगळे करून निर्घृण
खून करणाऱ्या आरोपीला अटक
कोल्हापूर : कसबा बावड्यामध्ये काल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका महिलेचे धारदार शस्त्राने शीर धडावेगळे करून निर्घृण खून करण्यात आला. कविता प्रमोद जाधव (वय ३८, रा. कसबा तारळे ता. राधानगरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. संशयित आरोपी राकेश शामराव संकपाळ (वय. 30, रा. लाईन बझार, कोल्हापूर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं. लग्नाला नकार दिल्याने हा खून केल्याचे उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी मिळालेली माहिती अशी कि, राकेश संकपाळ याचा फर्निचरचा व्यवसाय असून तो विवाहित आहे. आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कसबा बावडा परिसरातील लाईनबझार येथे राकेश संकपाळ याने कविता जाधव या विधवा महिलेवर धारदार शस्त्राने वार करून तीचे शीर धडावेगळे करून निर्घृण खून केला. यानंतर तो घटनास्थळावरुन पसार झाला. एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठलाग करुन ताराराणी पुतळा येथे राकेशला ताब्यात घेतलंय. त्याने गुन्ह्याची कबुली दिलीय. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.