
no images were found
बुद्धिबळ स्पर्धेत डॉक्टर हरीश पाटील,पत्रकार रवि आंबेकर व ॲडव्होकेट संतोष शेलार अजिंक्य, प्रकाश शारबिद्रे व बाळासाहेब काळे उपविजेते
कोल्हापूर ( प्रतिनिधी):-केंद्र शासनाने क्रीडा दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्मचारी व व्यावसायिका मध्ये विविध खेळाची गोडी व आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांच्यासाठी विविध स्पर्धा घेण्याचे जिल्हा क्रीडा कार्यालयाला पत्रकाद्वारे निर्देशित केले होते.. त्यानुसार चेस असोसिएशन कोल्हापूर च्या सहकार्याने डॉक्टर,पत्रकार व वकील याच्यासाठी बुद्धिबळाची स्पर्धा आयोजित केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथील बुद्धिबळ संघटनेच्या हॉलमध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार ही स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले. यावेळी चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले,सचिव मनिष मारुलकर, उपाध्यक्ष धीरज वैद्य, पत्रकार राजेंद्र मकोटे व रवींद्र पाटील सर उपस्थित होते.
अंतिम सातव्या फेरीनंतर प्रत्येक गटातील पहिल्या दोन क्रमांकांना चषक देऊन गौरविण्यात आले़.
डॉक्टर :- 1) डॉ.हरीश पाटील 2) डॉ. प्रकाश शारबिद्रे
पत्रकार :- 1) रवी आंबेकर (कोल्हापूर कॉलिंग) 2) बाळासाहेब काळे (एस न्यूज)
वकील 1) ॲडव्होकेट संतोष शेलार
सदर स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले व फिडे पंच रवींद्र पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले.