no images were found
डीकेटीईच्या १४ विद्यार्थ्यांची थरमॅक्स या नामांकित कंपनीत निवड
इचलकरंजी (प्रतिनिधी) येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल आणि इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमधील मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल व इटीसी विभागातील १४ विद्यार्थ्यांची थरमॅक्स या नामांकीत कंपनीत कॅम्पस इंटरव्हयूवव्दारे निवड झाली आहे. उर्जा क्षेत्रातील या अद्ययावत तंत्रज्ञानाचा फायदा इंजिनिअरींच्या विद्यार्थ्यांना होण्यासाठी डीकेटीई व थरमॅक्स यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारातर्ंगत डीकेटीईमध्ये कॅम्पस प्लेसमेंट पार पडला यामध्ये त्यांनी गुणवत्ता चाचणी, ग्रुप डिस्कशन, विविध संभाषणाव्दारे व गुणवत्तेच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड केली आहे.
थरमॅक्स कंपनी ही उर्जा क्षेत्रातील एक नामवंत कंपनी असून उर्जा क्षेत्रातील नवनवीन आणि अद्ययावत तंत्रज्ञानामध्ये ही कंपनी अग्रेसर आहे. डीकेटीई व थरमॅक्स या करारांतर्गत चार महिन्याचा आणि एकूण २०० तासांचा पॉवर प्लॉट इंजिनिअरींग हा कोर्स डीकेटीई आणि थरमॅक्स यांच्या परस्पर सहकार्याने साकार झाला आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या पॉवर प्लांट इंजिनिअरींग या विषयाच्या प्रॅक्टीकल ज्ञानामध्ये भर पडलेली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये उद्योगविश्वाला आंतरविद्याशाखीय (interdisciplinary) प्रकल्पांवर काम करु शकतील अशा अभियंत्यांची गरज आहे. त्या अनुशंगाने व उद्योगविश्वाची गरज लक्षात घेवून डीकेटीई मध्ये अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाचा समावेश केला गेला आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांची विविध कंपन्यामध्ये निवड होण्यास मदत होत आहे.
या कॅम्पस इंटरव्हयू मधून डीकेटीईच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल व इटीसी इंजिनिअरींग विभागातील १४ विद्यार्थ्यांना थरमॅक्स या कंपनीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी मिळाली यामध्ये कौशिक पाटील, प्रतिक पाटील, विवेक पोतदार, ॠुतूजा गायकवाड, गायत्री राजगोळे, रोहन शेटे, अशुतोष शिंत्रे, नितीन दुधाणे, योगेश चव्हाण, शुभम चौधरी, यश शेटटी, साक्षी कणिरे, उत्कर्ष पाटील व प्रज्ञा पाटील हे विद्यार्थी निवड झालेले आहेत.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाशआण्णा आवाडे, सचिव डॉ सपना आवाडे व सर्व विश्वस्त यांनी शुभेच्छा दिल्या. सदर विद्यार्थ्यांस संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस. आडमुठे,विभागप्रमुख डॉ.व्ही.आर. नाईक, डॉ. आर.एन.पाटील, डॉ.एस.ए.पाटील, टीपीओ प्रा.जी.एस. जोशी व सर्व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.