Home शासकीय जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे यशस्वी आयोजन

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे यशस्वी आयोजन

4 second read
0
0
21

no images were found

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे यशस्वी आयोजन

 

कोल्हापूर : कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व यांच्या संयुक्त विद्यमाने  जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव सन 2024- 25 चे आयोजन महालक्ष्मी सांस्कृतिक भवन, कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी लि. कोल्हापूर, टाकाळा येथे संपन्न झाला. यावेळी आमदार सतेज डी. पाटील, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अजय कुलकर्णी, आत्मा प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर, सिध्दगिरी कृषि विज्ञान केंद्र, कणेरी गृह विज्ञान शास्त्रज्ञ डॉ. प्रतिभा ठोंबरे, करवीर विभागीय कृषि अधिकारी अरुण भिंगारदिवे, कोल्हापूर विभागीय कृषि अधिकारी जयश्री हावळे, करवीर तालुका कृषि अधिकारी बंडा कुंभार तसेच कृषि विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

 या कार्यक्रमाची सुरुवात अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कृषि विभागामार्फत विविध महोत्सव तसेच नाविण्यपूर्ण संकल्पना शेतकऱ्यांसाठी राबवित आहे, यांचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा. आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्या वापर आपल्या दैनंदिन आहारात करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत होते. या भाज्यांचे संवर्धनही  करणे गरजेचे असल्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार सतेज डी. पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला व महोत्सवातील रानभाज्या प्रदर्शनाला भेट दिली. आत्मा प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर, सिध्दगिरी कृषि विज्ञान केंद्र, कणेरी शास्त्रज्ञ डॉ. प्रतिभा ठोंबरे यांनी महोत्सवाला उपस्थित सर्वांना रानभाज्या विषयी सविस्तर माहिती दिली.

रानभाज्यांचे नमुने व त्यांची पाककृती स्पर्धेतून निवडलेल्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या महोत्सवातील रानभाज्या प्रदर्शनाला मान्यवरांनी भेट देवून रानभाज्या विषयी माहिती जाणून घेतली. सुमारे 350 महिला शेतकरी व शेतकरी गटांनी रानभाजी महोत्सवात सहभाग घेतला. या महोत्सवामध्ये शेवगा, करटुले, रान, कोवळे बांबू, अळू, लाल, केन, पाथरी, मटारु, कपाळफोडी, आघाडा, आंबाडा, व्हनगोती, रान कारली, माठ, भांगीरा, घोळ, कुर्ड, गुणुवली, शेंडवेल, तोंडली इ. रानभाज्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…