Home शासकीय होमगार्ड भरतीच्या मैदानी चाचणीसाठी पुरुष व महिला उमेदवारांनी उपस्थित रहावे  – जयश्री देसाई

होमगार्ड भरतीच्या मैदानी चाचणीसाठी पुरुष व महिला उमेदवारांनी उपस्थित रहावे  – जयश्री देसाई

12 second read
0
0
60

no images were found

होमगार्ड भरतीच्या मैदानी चाचणीसाठी पुरुष व महिला उमेदवारांनी उपस्थित रहावे  – जयश्री देसाई

 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याकरिता होमगार्ड पुरुष व महिलांचा अनुशेष, रिक्त जागा भरण्याबाबत ऑनलाईन प्रणालीतुन https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php अन्वये दि. 26 जुलै 2024 ते दि. 14 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते, त्यानुसार पुरुष व महिला यांच्या प्राप्त अर्जाप्रमाणे मुळ कागदपत्र तपासणी व मैदानी चाचणी दिनांक 28 ते 30 ऑगस्ट 2024 पर्यंत पोलीस कवायत मैदान, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज रजिस्टर क्रमांका प्रमाणे व नमुद तारखेस वेळेत मुळ कागदपत्रे व त्याच्या 2-2 छायांकित प्रती कागदपत्रे व 4 कलर आयडेंटी साईज फोटो सहित उपस्थित रहावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक तथा होमगार्डच्या जिल्हा समादेशक जयश्री देसाई यांनी केले आहे.

दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 ते सकाळी 10, महिला, अर्ज नोंदणी क्र. 8 ते 9746 सर्व महिला असे एकूण 1163 तर दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 ते सकाळी 10.30, पुरुष, अर्ज नोंदणी क्र. 1 ते 2410 असे एकूण 2137,  दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 ते सकाळी 10.30, पुरुष, अर्ज नोंदणी क्र. 2411 ते 6141 असे एकूण 3300 व  दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 ते सकाळी 10.30, पुरुष, अर्ज नोंदणी क्र. 6143 ते 9745असे एकूण 3218 याप्रमाणे उमेदवारांनी उपस्थित रहायचे आहे.  

 नियोजित तारखेस काही अपरिहार्य कारणास्तव बदल झाल्यास त्याबाबत पुढील तारीख त्या-त्या उमेदवारांना कळविण्यात येईल. उमेदवारांनी वरील नमुद वेळेत नोंदणी प्रक्रियेकरिता उपस्थित राहणे बंधनकारक आहे. नमुद वेळेनंतर उपस्थित राहणा-या उमेदवारांना नोंदणी प्रक्रियेकरिता प्रवेश दिला जाणार नाही, असेही श्रीमती देसाई यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…