no images were found
पन्हाळा येथे चांद्रयान-३ व अंतराळ प्रदर्शन
कोल्हापूर(प्रतिनिधी) : इस्रोने १४ जुलै २०२३ रोजी श्रीहरीकोटा येथून लाँच केलेलं चांद्रयान ३ हे अवकाशयान २३ ऑगस्ट २०२३ रोजी यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं. 23 ऑगस्ट 2024 रोजी या उल्लेखनीय कामगिरीचा पहिला वर्धापन दिन होता. या प्रसंगी शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्रात ‘चांद्रयान ३ व अंतराळ’ या विषयावरील प्रदर्शन सर्वांसाठी खुले करण्यात आले . या निमित्याने आज जवाहर नवोदय विद्यालय कागल आणि पन्हाळा विद्यामंदिर, पन्हाळा येथील विद्यार्थी आणि शिक्षकांनी भेट दिली.