no images were found
पथविक्रेता समितीचे आरक्षण सोडत जाहीर
कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये पथविक्रेता समितीसाठी 4 सप्टेंबरला मतदान होणार असून याची निवडणूक प्रक्रिया शनिवारपासून सुरु झाली आहे. यामध्ये 8 फेरीवाल्यांच्या प्रतिनिधीची नियुक्त करण्यात येणार असून आज दुपारी 3 वाजता दुधाळी पॅव्हेलियन येथे महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये अनुसूचित जाती 1, अल्पसंख्याक 1, खुला प्रवर्ग शासनाने ठरवून दिलेले 1 असे 3 महिलांसाठी राखीव झाले आहे. तर इतर सदस्यांमध्ये खुला प्रवर्गासाठी 2, अनुसूचित जमाती 1, इतर मागासवर्ग 1, दिव्यांगसाठी 1 अशी सदस्यांची नियुक्ती होणार आहे. या निवडीसाठी 5630 फेरीवाल्यांना मतदानाचा हक्क आहे. ही आरक्षण सोडत नूतन आदर्श विद्यालय व विकास हायस्कुलची विद्यार्थीनींद्वारे काढण्यात आली. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उप-आयुक्त साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पाटील, इस्टेट ऑफिसर विलास साळुंखे, एनयुएलएमचे व्यवस्थापक रोहित सोनुले, विजय तळेकर, विजय वणकुंद्रे यांनी आरक्षण सोडतीचे कामकाज पाहिले.