no images were found
मतदारांनी मतदार नोंदणी व नावात दुरुस्तीचे अर्ज संबधित मतदान नोंदणी अधिकाऱ्यांकडे सादर करावेत – अमोल येडगे
कोल्हापूर: भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे. या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी 20 ऑगस्ट 2024 असा आहे. राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत दि. 17 ऑगस्ट (शनिवार) व दि. 18 ऑगस्ट 2024 (रविवार) या दोन्ही दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे सर्व मतदान केंद्रावर हजर राहुन मतदार नोंदणी करणार आहेत. सर्व मतदारांनी आपल्या मतदार नोंदणी व नावात दुरुस्ती, पत्यामध्ये बदल अशा प्रकारचे अर्ज संबधित मतदान नोंदणी अधिकारी (BLO) यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.